Tourism Season : पर्यटकांची खुष्‍कीच्या मार्गाला पसंती

Tourist Season : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असून खुष्‍कीचा मार्ग म्‍हणून चालकांसह पर्यटक, प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.
Wakan-Pali-Khopoli Highway
Wakan-Pali-Khopoli HighwayAgrowon
Published on
Updated on

Pali News : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असून खुष्‍कीचा मार्ग म्‍हणून चालकांसह पर्यटक, प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. धुरळा व वाहतूक कोंडी नित्याचीच आहे.

हा त्रास टाळण्यासाठी पर्यटक व प्रवासी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरून प्रवास करण्यास पसंती देत आहेत. शिवाय अवजड व औद्योगिक वाहनांचीही वर्दळ या मार्गावरून मोठ्या प्रमाणात होत आहे.

Wakan-Pali-Khopoli Highway
Maharashtra Drought Condition : महाराष्ट्रात दुष्काळ वाढतोय, १० जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी, शासनाकडून निधीही वितरीत

जैवविविधतेने नटलेले निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा यामुळे दिवाळीनंतर नाताळपर्यंत पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. सध्या पुणे-मुंबईसह राज्याबाहेरील पर्यटकही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर दाखल होत आहेत. त्‍यामुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, घोडेस्‍वारी आदींची चलती आहे.

पाली-खोपोली राज्यमार्ग पूर्वी बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. काही वर्षांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तो हस्तांतर करून रुंदीकरण करण्यात आले. २०० कोटींचा निधी खर्च करून काँक्रिटीकरण, साईडपट्टी, नाले, वृक्षारोपण आदी कामे केली आहेत.

Wakan-Pali-Khopoli Highway
Milk Rate : शासनाच्या आदेशाची होळी ! दूध दरावरून रयत क्रांती संघटना आक्रमक

नवीन पुलांची निर्मिती

वाकण-पाली-खोपोली मार्गावर भालगुल व जांभूळपाडा येथील नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. तर पाली अंबा नदीवरील एका बाजूच्या पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल २५ कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचा आक्षेप

रुंदीकरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. काम झाले, तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. रस्‍त्‍यासाठी बेकायदा जमीन अधिगृहण केल्याचा आरोप करत काही शेतकऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र शासन, एमएसआरडीसीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com