Tomato Price Crash : कोंढा येथे ग्रामपंचायतीसमोरच टोमॅटोचा केला ‘लाल चिखल’ ; तोडणी खर्चही परवडत नसल्याने शेतकरी संतप्त

Tomato Crop : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने दर नसल्याने टोमॅटोचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच लाल चिखल केला. ऐन उन्हाळ्यात खर्च करूनही दर पडल्याने शेतकऱ्याला टोमॅटो तोडणेही परवडत नाही.
Tomato Crop Damage
Tomato Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Tomato Farming : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने दर नसल्याने टोमॅटोचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच लाल चिखल केला. ऐन उन्हाळ्यात खर्च करूनही दर पडल्याने शेतकऱ्याला टोमॅटो तोडणेही परवडत नाही. परिणामी व्यवस्थेचा निषेध करत टोमॅटो तुडवून फेकून दिल्याची घटना घडली.

कोंढा येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी गजाजन कदम दीड एकर टोमॅटो लागवड केली होती. त्यात आजपर्यंत एकूण दोन लाख रुपये खर्च झाला. बाजारात ४० कॅरेट टोमॅटो विक्रीस नेले. यास ५५ रुपये प्रति कॅरेट दर मिळाला. तर या एका कॅरेटसाठी ७० रुपये खर्च आला. त्यामुळे प्रति कॅरेट १५ रुपये नुकसान सोसावे लागले. टोमॅटो विक्रीतून ६०० रुपये नुकसान झाले.

Tomato Crop Damage
Tomato Market News : टोमॅटोचा शिवारातच साचला लाल चिखल

त्यामुळे शेतकऱ्याने तोडलेले टोमॅटो कोंढा ग्रामपंचायतीसमोर आणून त्याचा लाल चिखल केला. ज्या वेळी टोमॅटोचे दर वाढले होते, त्या वेळी सरकारने बाजारात हस्तक्षेत करत बाहेरून टोमॅटो मागविले होते. आता टोमॅटोचा दर पडलेल्या असताना येथील शेतकऱ्यांना तोडणी करणेही परवडत नाही, अशावेळी सरकार शेतकऱ्यांना मदत का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. 

सुलतानी संकटाबरोबरच बाजारू व्यवस्थेनेही शेतकऱ्यांना मारले आहे, अशी भावना टोमॅटो उत्पादक शेतकरी गजानन पाटील, कदम, कोंडेकर यांनी व्यक्त केली. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील टोमॅटो उत्पादकांची हीच गत आहे. टोमॅटोसाठी लागणार खर्च अधिक असल्याने ते कमी दराने विक्रीसाठी परवडत नाहीत. परिणामी टोमॅटो तोडणीविना शेतात सोडून द्यावे लागत आहेत.

Tomato Crop Damage
Tomato Market : लाल चिखल, दर पडल्याने बांधावर टोमॅटोचा खच

भाजप सरकार हमीभाव देऊ म्हणून आश्वासन देते, परंतु हे हवेतच विरले आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणून आश्वासन दिले होते. उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच, परंतु शेतीचा खर्च मात्र दुप्पट-तिप्पट झाला आहे.

- प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर, 

अर्थशास्त्राचे अभ्यासक, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com