Tomato Auction : हिवरगाव उपबाजार आवारात टोमॅटो लिलावास सुरुवात

Sinnar APMC : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हिवरगाव उपबाजार येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे यांच्या हस्ते टोमॅटो खरेदी-विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.
Tomato Auction
Tomato AuctionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हिवरगाव उपबाजार आवार सिन्नर व निफाड तालुक्याच्या सीमेवर आहे. येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हिवरगाव उपबाजार येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे यांच्या हस्ते टोमॅटो खरेदी-विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी टोमॅटो शेतीमालाची हिवरगाव उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. टोमॅटो खरेदी-विक्रीच्या प्रारंभी संतोष किसन घुगे, (रा. केपा. नगर) यांचा टोमॅटोस प्रतिक्रेट ७०१ रुपये दर मिळाला. व्यापारी अनिल प्रभाकर हारक यांनी खरेदी केला.

पहिल्याच दिवशी सुमारे १०० ते १५० वाहनांतून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन आले होते. या वेळी केशव कोकाटे, संजय सानप, बबन पोमनर, बाळासाहेब पोमनर, ईश्वर पोमनर, संतोष पोमनर, सुकदेव ढेपले, राजेंद्र पोमनर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बाजार समिती उपसभापती सिंधुताई कोकाटे, संचालक जालिंदर थोरात, सुनील चकोर, गणेश घोलप, रवींद्र शेळके, प्रकाश तुपे हे संचालक उपस्थित होते.

Tomato Auction
Tomato Auction : संगमनेर बाजार समितीत टोमॅटोचा लिलाव सुरू

टोमॅटो शेतीमाल खरेदीसाठी प्रवीण चव्हाणके, आलाउद्दीन पटेल, अनिल हारक, गणी सैय्यद, मुन्ना घोलप, सारंग घोलप, नाना खरात, प्रमोद यादव, राहुल गडगे, योगेश गाडेकर, निवृत्ती चव्हाणके, अभिजीत थिगळे, अस्मल शेख, दिलावर बागवान, शौकत बागवान, उबेदशेठ शेख, अबीदशेठ शेख, शाकीरशेठ शेख, दत्तात्रयशेठ हारक, जुबेर बशिर, बबलू शेख, आसिफ बागवान, कादिर शेख, देविदास खरात, नितेश कदम, संतोष जोशी, मोहसीन लियाकत, सुरेश शेळके, नाजीम शेख, शकिल शेख, सुनील नरोडे, इरफान गणी शेख, अमोल खोलम, नितीन आरोटे, विनोद बलवाणी, विकास घुगे, बाळू चकोर, वैभव घुगे यासह अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.

Tomato Auction
Tomato Rate : टोमॅटो स्वस्त, पालेभाज्या महागल्या; कोल्हापूर सांगली बाजारपेठेतील जाणून घ्या स्थिती

शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीमाल प्रतवारी करून २२ किलो क्रेटसह वजन करून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती गाडे यांनी केले आहे. दर सोमवारी ते रविवारी सप्ताहातील सर्व दिवस दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत टोमॅटो शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील.

शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी बांधावर किंवा शिवारमापाने विक्री न करता टोमॅटो शेतीमाल हिवरगाव उपबाजार आवारातच विक्रीसाठी आणावा व शेतीमाल विक्रीची रोख रक्कम घेऊन जावे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाचे पैसे रोख स्वरूपात व्यापाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावेत. जो व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असेल त्याच्याबाबत लेखी तक्रार सादर करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com