Summer Crop : आजऱ्यात उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात यंदा ३० हेक्टरने घट

Summer Farming : आजरा तालुक्यात पाण्याअभावी यंदा दृष्काळसदृश स्थिती तयार झाल्याने उन्हाळी पिकांखालील क्षेत्र घटले आहे.
Summer Crop
Summer Crop Agrowon

Kolhapur News : आजरा तालुक्यात पाण्याअभावी यंदा दृष्काळसदृश स्थिती तयार झाल्याने उन्हाळी पिकांखालील क्षेत्र घटले आहे. ही घट सुमारे ३० हेक्टर इतकी असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Summer Crop
Summer Crops : यंदा उन्हाळी पिकाखालील क्षेत्र घटले

तालुक्यात खरीप हंगाम मोठा असतो. २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरिपातील भात, नागली, भुईमूग, सोयाबीनसह अन्य पिके घेतली जातात. रब्बी हंगामात सुमारे १५० ते २०० हेक्टरवर मका, गहू, हरभरासह अन्य भाजीपाला पिकांची लागवड होते.

उन्हाळी पीक म्हणून भुईमूग व चारापिके घेतली जातात. यंदा रब्बी व उन्हाळी पीक क्षेत्रामध्ये घट झाली आहे. उन्हाळी पिकांखालील क्षेत्र ३० हेक्टरने कमी झाले आहे. गत वर्षी तालुक्यात उन्हाळ्यात भुईमुगाची ६५ हेक्टर क्षेत्रांवर लागवड झाली होती.

Summer Crop
Summer Crop Cultivation : उन्हाळी पिकांच्या लागवडीत मोठी वाढ

यंदा ४५ हेक्टर क्षेत्रांवर लागवड झाली आहे. ४० हेक्टरवर चारापीक घेतले जात होते. यंदा ३० हेक्टर क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे.

परतीचा पाऊस झालेला नाही. शिवाय, वळवाचा पाऊसदेखील पडलेला नाही. नदी, ओढापात्रातील खडक दिसू लागले आहेत. शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई तयार झाल्याने दुष्काळसदृश स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com