Fake Fertilizer Stock : कृषी विभागाच्या धाडीत बनावट खतसाठा जप्त

Agriculture Department Raid : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून अहमदपूर येथे कृषी विभागाने कापूस बियाण्यांचा साठा सील केला होता.
Fake Fertilizer
Fake Fertilizer Agrowon
Published on
Updated on

Latur News : कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून अहमदपूर येथे कृषी विभागाने कापूस बियाण्यांचा साठा सील केला होता. त्यानंतर कृषी विभागाने सोमवारी (ता. १०) केलेल्या कारवाईत बनावट खतांचा साठा उघड केला. याप्रकरणी किनगाव (ता. अहमदपूर) येथील एका कृषी सेवा केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर चाकूर येथेही एका केंद्रचालकाच्या गोदामातील खतांचा बनावट साठा जप्त केला.

Fake Fertilizer
Agriculture Fertilizers : पिकांना द्या संतुलित खतमात्रा

दरम्यान चाकूरच्या केंद्रचालकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कृषी विभागाच्या कारवाईमुळे कृषी निविष्ठांच्या विक्रीत गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पेरण्या तोंडावर आल्या असतानाच कृषी सेवा केंद्रांकडून पसंतीच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई करून त्याची जादा दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू झाले. विशेषतः अहमदपूर तालुक्यात कृषी विभागाच्या संगनमतानेच प्रकार सुरू असल्याचे वाटत होते. त्यानंतर प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी हा प्रकार रोखण्यास सुरुवात केली.

Fake Fertilizer
Agriculture Fertilizers Stocks : ‘पणन’ला खतांचा अतिरिक्त कोटा द्या : अजित पवार

यातच कृषी विभागाने पुढाकार घेऊन अनेक शेतकऱ्यांना छापील किमतीत बियाणे उपलब्ध करून दिले. त्यानंतर जादा दराने बियाणे विक्रीची तक्रार येताच संबंधित दुकानाची तपासणी करून साडेतीन लाख रुपये किमतीच्या कापूस बियाण्यांचा साठा सील केला. ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे बनावट खतांची विक्री सुरू असल्याची चाहुल कृषी विभागाला लागली.

यातूनच विभागाच्या पथकाने सारोळा (ता. रेणापूर) येथील एका शेतकऱ्याच्या शेडमधून बनावट डीएपी खताचा साठा जप्त केला. विशिष्ट कंपनीचा डीएपी खत आहे, असे भासवून अनेक शेतकऱ्यांना बनावट खत विक्री केल्याप्रकरणी किनगाव येथील माऊली कृषी सेवा केंद्र चालक नामदेव विश्वनाथ खेरडे याच्या विरोधात मोहीम अधिकारी मिलिंद भागवत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आहे. यानंतर चाकूर येथील एका कृषी सेवा केंद्राच्या गोदामावर टाकलेल्या छाप्यात २१८ बनावट खतांची पोती आढळून आली. या पोत्यांतील खतांचे नमुने घेत खत जप्त केले व गोदामाला कृषी विभागाने सील केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com