

Devani News : यांत्रिकीकरण व शेती करण्याच्या बदलत्या पद्धतीमुळे शेतीमध्ये बैलांची जागा ट्रॅक्टरसह विविध यंत्रानी घेतली असून, घटत्या बैलांच्या संख्येमुळे गावागावातील ग्रामीण भागात आता प्रतीकात्मक बैलांचीच पूजा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या शेतीपद्धतीमुळे गावागावात पूजन करण्यासाठीही बैल मिळणे कठीण झाले आहे.
बैलपोळा शेती अन् शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण. वर्षभर शेतीत कष्ट करणाऱ्या बैलबारदान्याचे सलग दोन दिवस पूजन करण्याची परंपरागत प्रथा. पहिल्या दिवशी बैलांना स्वच्छ व व्यवस्थित धुऊन त्यांची सायंकाळच्या वेळी विधिवत पूजा करून त्यांना दुसऱ्या दिवशीचे आमंत्रण दिले जाते. त्यासाठी आज आवतण घ्या आणि उद्या जेवायला या, अशा शब्दांत बैलांना घरोघरी आमंत्रण दिले जाते.
तर, पोळ्याच्या दिवशी दिवसभर बैलांची विविध पद्धतीने सजावट, सकाळच्या वेळी त्यांना पिण्यास देण्यात येणारे पेय, त्यानंतर दुपारी गावातील मुख्य मंदिराभोवती वाजतगाजत निघणारी मिरवणूक व त्यानंतर होणारा सोहळा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा घटक.
मात्र, बदलत्या स्थितीत पशुधनाची घटती संख्या अन् शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे बैलपोळ्यातील उत्साहात कमतरता जाणवत आहे. श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा होणारा सण म्हणजै बैलपोळा. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. बैलपोळा सणादिवशी सर्व बैल गावातील मंदिरासमोर एकत्र आल्यानंतर त्याला यात्रेचे स्वरूप येते. शेतशिवारात हंबरण्याचा
आवाज झाला दुर्मिळ
ज्या शेतकऱ्याकडे तीन ते चार बैलजोड्या असायच्या त्यांच्याकडेही पूजा करण्यासाठीही बैल नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बहुतांश गावांत आता बैलांऐवजी ट्रॅक्टरचीच मिरवणूक निघत असल्याचे चित्र आहे.
बैलांची संख्या दिवसेंदिवस घटतेय
गेली दशकभरात यंत्रांचा शेतीमध्ये वाढलेला वापर, सालगडी व शेतमजुरांची टंचाई, बैलांचे वाढलेला भाव, चारावर्गीय पिकातील घट, शेतीमध्ये नियमित वापरासाठी बैलाऐवजी यंत्राचाच सुलभपणे होत असलेला वापर यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस घटतच चालल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पूर्वी असलेली बैलांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने घटतच असल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.