Bail Pola 2024 : पोळा आनंदी, उत्साही होण्यासाठी अशी घ्या सर्जा, राजाची काळजी

Team Agrowon

आज बैल पोळा आहे. तुमची सर्जा-राजाची जोडी तर वाट बघतच असेल, पण तुम्ही सुद्धा, आपलीच बैलजोडी रुबाबदार दिसावी याच्या जय्यत तयारीत असालच की. आपल्या बैलाची शान म्हणजे आपली शान.

Bail Pola 2024 | Agrowon

पोळ्याला बैलं सजवताना आपल्याच नकळत  त्यांच्या आरोग्याकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे दुर्घटना घडतात. असं होऊ नये म्हणून, बैल पोळा बैलांसाठी ही आरोग्यदायी असावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

Bail Pola 2024 | Agrowon

बैलांना स्वच्छ पाण्यानेच आंघोळ घाला. जर सार्वजनिक ठिकाणी जर आंघोळ घातली असेल तर बैलांच्या अंगावर बाह्यपरजिवीनाशक फवारा आणि त्यांना जंतनाशक पाजा.

Bail Pola 2024 | Agrowon

पुजा झाल्यानंतर बैलांना  ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जातो. आता हेच पदार्थ प्रमाणाबाहेर खायला घालू नये. नाहीतर पोटाच्या चौथ्या आणि सर्वात मोठ्या भागाला ईजा पोचते.

Bail Pola 2024 | Agrowon

शिंग रंगवण्यासाठी ऑइल पैंट्सचा वापर करतात ज्यात झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, कॅडमियम सारखे त्वचेला घातक रसायने असतात. म्हणून शिंगाना नैसर्गीक रंग द्या आणि शिंग साळणे शक्यतो टाळा.

Bail Pola 2024 | Agrowon

बैल तजेलदार,मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून बैलांना तेलातून अंडी पाजतात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने  पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ़ुसात जात. त्यामुळे फुफ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन बैल दगाऊ शकतात.

Bail Pola 2024 | Agrowon

बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांणा आकार देण्यासाठी ती साळतात. शिंग साळण्यासाठी वापरलेली वस्तू निर्जंतुक केलेली नसेल तर बैलाला जखम होऊन शिंगाच्या कर्करोग होऊ शकतो.

Bail Pola 2024 | Agrowon

बैलांची संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात.  मोठा आवाज आणि गर्दीमुळे बैल बिथरतात. अशा वेळेस बैल उधळण्याची शक्यता असते.

Bail Pola 2024 | Agrowon
आणखी पाहा...