Tiger Terror : तीन बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद

Chandrapur Tigress Captured : मरेगाव, आकापूर, चितेगाव आणि एमआयडीसी परिसरात या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकरी, मजूर दहशतीत होते. वाघिणीच्या तीन शावकांना पकडण्यासाठी वनविभागाचे रेस्कू ऑपरेशन सुरू आहे.
Tiger Sighting
Tiger Terror Agrowon
Published on
Updated on

Chandrapur News : तीन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद झाली. वनविभागाच्या पथकाला या कामात यश मिळाले. मरेगाव गावाजवळील उमा नदीच्या परिसरात बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन अचूक निशाणा साधत वाघिणीला जेरबंद करण्यात आले.

मरेगाव, आकापूर, चितेगाव आणि एमआयडीसी परिसरात या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकरी, मजूर दहशतीत होते. वाघिणीच्या तीन शावकांना पकडण्यासाठी वनविभागाचे रेस्कू ऑपरेशन सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत शावकांना पकडण्यात यश आले नव्हते. या प्रकरणी परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Tiger Sighting
Vidarbha Tiger Crisis: देशातील वाघांचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात

मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात मेंढपाळ नीलेश दुर्गा कोरेवार, चितेगाव येथील युवा शेतकरी शेषराज पांडुरंग नागोशे आणि मेंढपाळ मल्लाजी येग्गावार यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाच एप्रिलपासून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम आखली होती. उमा नदीच्या परिसरात शिकारीसाठी आलेल्या वाघिणीवर वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकार यांनी अचूक निशाणा साधून बेशुद्घ केले. रेस्कू ऑपरेशनसाठी वनविभागातील ७० कर्मचाऱ्यांचा चमू कार्यरत होती.

Tiger Sighting
Tiger Rescue : येडशीतील वाघाची जबाबदारी पुण्याच्या बिबट्या पकडणाऱ्या पथकावर

वाघीण पिंजऱ्यात जेरबंद असून तिच्या तीन शावकांचा आता शोध घेण्यात येत आहे. शावकांना पकडण्यासाठी ५० कॅमेरे लावण्यात आले असून, लाइव्ह कॅमेरे तीन आणि एक ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे. वाघिणीने परिसरातील जनावरे आणि चार जणांना जखमीसुद्धा केले होते. जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीला हलविण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

ज्या ठिकाणी वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्या परिसरात कडक पहारा देण्यात आला आहे. ही कारवाई चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या नेतृत्वात सावली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनरक्षक, क्षेत्रसहायक, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि शुटर यांनी केली. तीन शावकांना पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. वृत्त लिहीपर्यंत एकाही शावकाचा शोध लागला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com