Marathwada Rainfall : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम

Heavy Rain Crop Loss : रामनगर, विरेगाव महसूल मंडलांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. कुंभार पिंपळगावसह परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी सहा पासून पाऊस झाला.
Marathwada Rainfall
Marathwada RainfallAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कायम होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात गुरुवारी (ता. १२) दुपारनंतर पावसाने जोर पकडला. जिल्ह्यात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसादरम्यान मंठा तालुक्यात वीज पडून एक जणाचा मृत्यू व एक जण जखमी तर दोन ठिकाणी वीज पडून शेतकऱ्याची बैल जोडी दगावली. अंबड शहरासह रोहिलागड परिसरात जोरदार पाऊस झाला.

रामनगर, विरेगाव महसूल मंडलांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. कुंभार पिंपळगावसह परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी सहा पासून पाऊस झाला. जालना तालुक्यातील बाजीऊमरद येथे वीज पडून शिवाजी डोंगरे यांचे दोन बैल दगावले. मंठा तालुक्यात उमरखेडा या गावी गौतम जाधव (वय ४२) यांचा वीज पडून मृत्‍यू झाला. आंबोडा कदम येथील शेतकरी शंकर महाजन (वय ६८) दुपारी शेतात काम करीत असताना तीनच्या सुमारास वीज पडली.

Marathwada Rainfall
Maharashtra Rains: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले. आर्डा तोलाजी (ता. मंठा) येथील शेतकरी प्रल्हाद इरले यांचा एक बैल वीज पडून दगावला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी २०.६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर शहरासह आळंद परिसरात सायंकाळी ६ पासून वादळीवाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. बिडकीनसह चितेगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Marathwada Rainfall
Pune Rain News : शिरूरमध्ये पावसाचा दणका

ढोरकीन येथे जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. पाचोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. खुलताबादेत मृगाच्या पावसाची हजेरी लागली. महालगाव येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागली. लासूर स्टेशन तसेच आजूबाजूच्या परिसरात वादळी पावसाची हजेरी लागली.

चापानेरसह परिसरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. टाकळी राजेराय परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागली. अंभई येथे तासभर रिमझिम पाऊस झाला. हतनूर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यात सरासरी १०.६ मिमी पाऊस झाला. बीडमध्ये पावसाचा जोर कमी होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com