Zoological Museum : मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना

Tourism : मालगुंड येथे प्राणी संग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.
Tiger
TigerAgrowon

Ratnagiri News : मालगुंड येथे प्राणी संग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कोणीही बेरोजगार राहणार नाही. नागरिकांच्या संपूर्ण शंकांचे निरसन करूनच हा प्रकल्प करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या विशेष निधीतून मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते बुधधवारी (ता. १३) झाले.

Tiger
Water Tourism Centre : कोयनात होणार आंतरराष्ट्रीय जलपर्यंटन केंद्र

या वेळी सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आदी उपस्थित होते.

Tiger
Tourism Guide Training : ‘सारथी’ देणार पर्यटन मार्गदर्शनाचे प्रशिक्षण : अशोक काकडे

पालकमंत्री सामंत म्हणाले, की जिल्ह्यात प्राणी संग्रहालय व्हावे, ही आपली २००४ पासूनची इच्छा पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे. यासाठी आपण मंत्री असलेल्या विभागाच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयासाठी ७४ कोटींचा निधी मंजूर असून, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून ८ कोटी एवढा निधी प्राणी संग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधण्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

आरे वारे, गणपतीपुळे, मल्टीमीडिया शो बरोबरच प्राणी संग्रहालय झाल्याने येथे पर्यटकांमध्ये वाढ होईल. त्याबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन येथील कोणीही बेरोजगार राहणार नाही. वर्षाचे ३६५ दिवस येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. येथील भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com