Ujani Bird Census : उजनीत ३ मार्चला पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम

Ujani Bird Sanctuary : उजनी जलाशय हे वैविध्यपूर्ण पक्षीजीवनासाठी प्रसि‌द्ध आहे. बदके, करकोचे, पाणकोंबड्या, वेडर्स यासह ३०० हून अधिक प्रजाती इथे आढळतात.
Ujani Bird sanctuary
Ujani Bird sanctuaryAgrowon
Published on
Updated on

Solapur News : वार्षिक आशियायी वॉटरबर्ड सेन्सस (एडब्ल्यूसी) अंतर्गत वाइल्डलाइफ रिसर्च अँड कॉन्झर्व्हेशन सोसायटी (डब्ल्यूआरसीएस) आणि सोलापूर वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उजनी जलाशयात पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी ३ मार्चला पक्षिगणना कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

उजनी जलाशय हे वैविध्यपूर्ण पक्षीजीवनासाठी प्रसि‌द्ध आहे. बदके, करकोचे, पाणकोंबड्या, वेडर्स यासह ३०० हून अधिक प्रजाती इथे आढळतात. हा महत्त्वपूर्ण जलाशय, स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना निवारा व मुक्कामासाठी उपयुक्त आहे.

Ujani Bird sanctuary
Ujani Dam Water : सांगोल्यासाठी 'उजनी'चे दोन टीएमसी पाणी मिळणार

उजनी जलपक्षी गणना हा एक नागरिक विज्ञान (Citizen-Science) कार्यक्रम आहे. या जलपक्षी गणनेद्वारे जलपक्ष्यांची संख्या व त्यांचा विस्तार याबद्दल उपयुक्त माहिती मिळेल. त्याद्वारे जलपक्ष्यांच्या संर्वधनाला व त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संरक्षणाला व व्यवस्थापनाला मदत होईल.

Ujani Bird sanctuary
Ujani Dam Water Stock : उजनीतील पाणी आता फक्त पिण्यासाठीच

आज नोंदणीचा अंतिम दिवस

जलपक्षी गणनेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे. इच्छुक पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमींनी डब्ल्यूआरसीएस संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ऑनलाइन फॉर्म भरून जलपक्षी गणनेसाठी नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक- ९०२८८५१८१० व दूरध्वनीवर क्र. ०२०-४६७०४९०७ यावर संपर्क करावा, असे आवाहनही उपवनसंरक्षक पाटील यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com