Mahapareshan : ‘महापारेषण’ला तीन राष्ट्रीय पारितोषिके

Electricity : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत.

यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ॲण्ड पीआर, ब्रॅंडिंग,’ सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल ‘महापारेषण’चे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.

नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये २५ ते २७ नोव्हेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उद्‍घाटन समारंभात या पुरस्कारांचे वितरण होईल.

Electricity
Electricity Issue : वीजपुरवठा खंडित केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार

अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत व बहिर्गंत संपर्कासाठी केलेले उपक्रम, ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकात केलेले डिजिटल बदल, क्यू-आर कोड, नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, चक्रीवादळात अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, ड्रोनच्या साह्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी ही फिल्ममध्ये ॲनिमेशनचा वापर करून दाखविली आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.

Electricity
Electricity : दिवाळी साजरी करा; पण वीजसुरक्षेची काळजी घ्या

महापारेषणचे व्हॉट्‍सॲप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉट्‍सॲप चॅनेल, सोशल मीडियाचा सकारात्मक पद्धतीने जनसंपर्कासाठी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम, अभियान सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले. पॉडकास्टच्या माध्यमातून ‘आधुनिक संवाद’ ही संकल्पना राबविणारी महापारेषण ही पहिली कंपनी ठरली आहे.

जनसंपर्क विभाग सातत्याने सृजनशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. यंदाची दैनंदिनी व दिनदर्शिका देखील पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपात असेल. तसेच लवकरच कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)द्वारे ‘महापारेषण समाचार’च्या अंकाचा चेहरा-मोहरा बदलेल.
- डॉ. मिलिंद आवताडे, जनसंपर्क अधिकारी, महापारेषण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com