Electricity : दिवाळी साजरी करा; पण वीजसुरक्षेची काळजी घ्या

Power Safety : दिवाळी सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.
Smart Electricity Meter
Smart Electricity MeterAgrowon

Akola News : दिवाळी सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीजयंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

Smart Electricity Meter
Agriculture Electricity : भारनियमन बंद करा, अन्यथा आंदोलन

रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Smart Electricity Meter
Agriculture Electricity : रब्बीसाठी पूर्ण वेळ वीज, रोहित्रे तत्काळ द्या

...अशी घ्या काळजी

 दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सावध राहावे.

 घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी.

 विद्युत वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे आर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. - घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सुलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी.

 घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये.

 आकाशकंदील किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री पीनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या साह्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते.

 गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदीलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी.

 तुटलेली किंवा सेलो टेपने जोडलेली नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com