Chana Cultivation: हरभऱ्याच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या तीन गोष्टी

Chana Sowing : हरभऱा हे महाराष्ट्राचं प्रमुख रब्बी पीक आहे. आपल्याकडे प्रामुख्याने देशी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या हंगामात जर आपण हरभऱ्याची लागवड करणार असाल तर तीन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
Chana
ChanaAgrowon
Published on
Updated on

Rabbi Season: हरभऱा हे महाराष्ट्राचं प्रमुख रब्बी पीक आहे. आपल्याकडे प्रामुख्याने देशी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या हंगामात जर आपण हरभऱ्याची लागवड करणार असाल तर तीन महत्वाच्या गोष्टी  आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे पेरणीची वेळ, वाणाची निवड आणि पेरणीची पद्धत. या महत्वाच्या गोष्टींविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी दिलेली माहिती पाहुया. 

हरभरा  हे पीक आंतरपीक आणि फेरपालटीसाठी उत्कृष्ट पीक आहे. हरभऱ्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. हे पीक प्रामुख्याने जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेतलं जातं. हरभऱ्याची पेरणी करताना सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे पेरणीची वेळ.

पेरणीची वेळ

हरभऱ्याची पेरणी ही २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात केली जाते.  २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर वेळ टळून गेली म्हणजे उत्पादनात फार काही घट येते असं नाही. पण आधीच पीक केंव्हा शेतातून निघायलय, जमिनीत ओलावा किती आहे,पाऊस कधी पडतोय या गोष्टी महत्वाच्या आहेत. या बरोबरचं थंडी किती पडते आणि ती किती दिवस टिकून राहते याही गोष्टी महत्वाच्या आहेत.

साधारण एक ठोकताळा असा आहे की,  ऑक्टोबरच्या अखेरीस जर पेरणी केली म्हणजे दसरा आणि दिवाळी च्यामध्ये पेरणी केली तर दिवाळीनंतर चांगली थंडी पडते. याचा फायदा हरभऱ्याला होऊन हरभऱ्याच चांगल उत्पादन मिळण्यास मदत होते.

हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी हरभऱ्याला भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागले पाहिजेत. त्यासाठी काय करावं लागेल तर,  आपण दोन प्रकारे म्हणजे कोरडवाहू आणि बागाइती हरभरा पेरतो.

हरभर्‍याची उशीरा पेरणी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे अशाच ठिकाणी करता येते. तर ज्याठिकाणी ओल भरपूर आहे आणि पाण्याची चांगली सोय आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर हरभऱ्याची पेरणी करावी. कोरडवाहू हरभऱ्याची लवकर पेरणी झाली तर  पीक जर ऑक्टोबर हीटनध्ये सापडलं तर या वाणाची चांगली वाढ होत नाही. किंवा खूप उशीरा पेरणी झाली म्हणजे ऑक्टोबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जर हा वाण पेरला तरी सुद्धा वाढीवर परिणाम होतो. कारण जानेवारी, फेब्रुवारी या काळात उष्णता वाढत जाते. त्यामुळे हरभरा उत्पादनात घट येऊ शकते.

Chana
Dragon Fruit Farming : भरघोस उत्पादनासाठी अशी घ्या ड्रॅगन फ्रूटच्या फूल, फळांची काळजी

सुधारित वाणाची निवड

हरभऱा पेरणी करताना लक्षात घ्यायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुधारित वाणाची निवड. वाणाची निवड ही आपण हरभऱ्याची लागवड कधी करणार यावर आवलंबून आहे. हरभऱ्याचा फुले विक्रांत हा योग्य वेळी पेरणीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी खूप चांगला वाण आहे.

आपल्याला मशीनने हरभऱ्याची काढणी करायची असेल तर फुले विक्रम या वाणाची निवड करा आणि वेळेवर पेरणी करा. जर उशीरा लागवड करायची असेल आणि संपूर्ण कोरडवाहू लागवड करायची असेल तर,पाण्याची सोय नसेल तर अशा परिस्थितीत विजय या वाणाची निवड करा. विजय हे वाण जरी जुने झाले असले तरी मर रोगाला प्रतिकारक्षम आणि पाण्याचा ताण सहन करणारे वाण आहे.

तापमान जरी वाढलं तरी हे वाण तग धरतं. त्यामुळे कधीही कुठेही पेरण्यासाठी उत्तम वाण म्हणजे विजय हे आहे. याशिवाय हरभऱ्याचे दिग्विजय, फुले विश्वराज, पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम, बीडीएनजी-७९७ हेही चांगले वाण आहेत. हरभऱ्याला मर रोगाचा लागू नये यासाठी बिजप्रक्रिया अवश्य करा.

पेरणीची पद्धत

आता पाहुया हरभऱ्याची पेरणी नेमकी कोणत्या पद्धतीने करावी. तुम्ही जर बागायती जमिनीत हरभऱ्याची पेरणी करणार असाल तर सरी वरंब्यावर पेरणी करा. त्यासाठी हरभऱ्याची टोकन पद्धतीने पेरणी करावी लागते. टोकण करण्यासाठी मजूर लागतात. मजूरांची कमतरता असेल तर बीबीएफ यंत्राचा वापर करा.

बीबीएफ ने पेरणी केल्यास दोन किंवा तीन ओळी या गादीवाफ्यावर येतात आणि बाजूने सरी पाडली जाते. यामध्ये बीबीएफ ने जर गादीवाफ्यावर तीन ओळीत पेरणी केली तर, मधल्या ओळीला पाणी कमी पडत आणि बाजूच्या दोन ओळी चांगल्या येतात. हे टाळण्यासाठी  गादीवाफ्यावर फक्त दोनच ओळी पेराव्यात. असं केलं तर खूप चांगल बागायत उत्पादन मिळत.

बागायती हरभऱ्याच चांगल जर पीक आलं तर हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल हरभऱ्याच उत्पादन मिळत. पण कोरडवाहू मध्य़े तुम्ही कितीही मेहनत केली तरी तेव्हड उत्पादन मिळत नाही. पण जर कोरडवाहूमध्ये एक पाण्याची जर सोय असेल तर जवळ जवळ ५० टक्के उत्पादन वाढत. मग हे पाणी कधी द्यायचं. तर पीक ३० ते ३५ दिवसानंतर झाल्यानंतर द्याव. कारण या काळातच हरभऱ्याला फुले येतात.

विजयसारख्या वाणाला ३५ दिवसालाच फुले येतात. पण बाकीच्या वाणांना साधारणपने ४० ते ४५ दिवसानंतर फुले यायला सुरुवात होते. ज्यांना दोन पाणी देण शक्य आहे. त्यांनी पहिलं पाणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आणि दुसरं पाणी हे ५५ ते ६० दिवसानंतर द्यावं.

तीन पाण्याची सोय असेल तर २५ दिवसांनी पाणी देण्याची सोय करावी. म्हणजे रान ओलवून सुरुवातीला पेरणी करुन २५ दिवसांनी एक पाणी असं चारदा पाणी द्यावं. अशा प्रकारे गादीवाफ्यावर दोन ओळी हरभऱ्याच्या पेरुन चारदा पाणी दिलं तर हरभऱ्याच ३५ क्विंटल उत्पन्न मिळतं. आणि जर गादीवाफ्यावर तीन किंवा चार ओळीत हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर अशा हरभऱ्याला स्प्रिंकलरने पाणी देण्याची सोय करावी.

स्प्रिंकलरमुळे सगळ्या ओळींना चांगलं पाणी बसतं. स्प्रिकलरने पाणी देताना फार जास्त पाणी द्यायची गरज नाही. ४ सेंटीमिटर खोलीपर्यंत ओल जाईल या पद्धतीने पाणी द्यावं. पण ते कमी अंतराने म्हणजे साधारणपने १५ दिवसांच्या अंतराने द्यावं. अशा प्रकारे हरभऱ्याच्या पेरणीचे नियोजन केलं तर हरभऱ्याचं नक्कीच चांगल उत्पादन मिळू शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com