Dragon Fruit Farming : भरघोस उत्पादनासाठी अशी घ्या ड्रॅगन फ्रूटच्या फूल, फळांची काळजी

Team Agrowon

सध्या ड्रॅगन फ्रूट फळांचा हंगाम सुरू झाला आहे. फळांचा हंगाम साधारणतः जूनमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालतो.

Dragon Fruit Farming | Agrowon

एका हंगामामध्ये ५ ते ७ वेळा फुलधारणा होऊन ऋतुमानानुसार कमी-अधिक प्रमाणात फुलधारणा होते.

Dragon Fruit Farming | Agrowon

पावसाचे प्रमाण, वितरण आणि वारंवारता यानुसार हा हंगाम थोडाफार मागे पुढे होतो. ड्रॅगन फ्रूटमधील फुलधारणा ही होणारा पाऊस, त्यामुळे वाढलेली आर्द्रता आणि कमी झालेले तापमान यावर निर्धारित असते.

Dragon Fruit Farming | Agrowon

पाऊस जर नियमित आणि सरासरी एवढा पडला तर फळधारणा चांगली होते, परंतु सरासरीपेक्षा कमी झाला तर फळधारणा कमी होते.

Dragon Fruit Farming | Agrowon

फुलधारणा ही झाड आणि फांदीच्या परिपक्वतेवरती अवलंबून असते. सहसा, फुलधारणा होण्यासाठी फांदी कमीत कमी ६ ते ७ महिन्यांची असायला लागते.

Dragon Fruit Farming | Agrowon

एका फांदीवर १ ते १० कळ्या लागतात. परंतु यापैकी एक किंवा दोनच कळ्यांची फळधारणा होईल याची याची काळजी घ्यावी, जेणे करून राहिलेल्या फळांचे आकारमान व वजन व्यवस्थित एकसारखे राहील.

Dragon Fruit Farming | Agrowon

Dragon Fruit Farmingएका फांदीवर अधिक प्रमाणात फळे ठेवल्याने आकार व वजन कमी भरते. अशा फळांना कमी दर मिळतो.

Dragon Fruit Farming | Agrowon

अति कळी धारणा झाल्यानंतर त्यांची विरळणी करणे गरजेचे आहे. कळ्यांची विरळणी दोन टप्प्यांमध्ये करतात. जर एका फांदीवर पाच पेक्षा जास्त कळ्या असतील तर कळी अवस्था किंवा फूल उमलून दहा दिवसांनंतर कळ्या खुडाव्यात.

Dragon Fruit Farming | Agrowon

Snails Outbreak : यंदाही शंखी गोगलगाय धुमाकूळ घालणार का?

आणखी पाहा...