Agriculture News : तीन दिवसीय जागतिक डाळ संमेलनाचं दिल्लीत आयोजन| १६ फेब्रुवारीला 'ग्रामीण भारत बंद'ची हाक|राज्यात काय घडलं?

दिल्लीत १५ फेब्रुवारी रोजी जागतिक डाळ महासंघाचं तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात ४० देशातील मंत्री, अधिकारी आणि उद्योजक सहभागी होणार आहेत.
Pulses
Pulses Agrowon

जागतिक डाळ महासंघाच्या तीन दिवसीय संमेलन

दिल्लीत १५ फेब्रुवारी रोजी जागतिक डाळ महासंघाचं तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात ४० देशातील मंत्री, अधिकारी आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. डाळ उत्पादनात भारताला स्वालंबी व्हायचंय. त्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येतं. या संमेलनाचं आयोजन जागतिक डाळ महासंघ आणि नाफेडच्या वतीनं करण्यात येत आहे. या संमेलनात भविष्यातील शाश्वत शेती आणि डाळ पिकांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारीच्या भारत बंदची हाक

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदचे आवाहन करण्यात आलंय. या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय. राज्यभरात रास्ता रोको, मोर्चा आणि बंद करून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरीद्वेष्ट्या धोरणातून शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांचे मात्र उखळ पांढरे होत आहे. ३८३ दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनास शेतीमालाच्या हमीभावाचा हक्क देणारा कायदा करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेत विरले आहे. उलट विदेशी शेतीमालाची करमुक्त आयात करून कापूस, सोयाबीन शेतीमालाचे भाव पाडले आहेत. हमीभावाची किंमत देखील शेतकऱ्यांना नाकारण्यात येत आहे. या विरुद्ध देशभरातील ५४२ पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकजुटीने बनलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे शुक्रवारी ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन केलंय.

Pulses
Cotton MSP : कापसाची हमीभावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल ?|संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार?

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या राजपत्रित अध्यादेश आणि मसुद्याची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन सगेसोयरेबाबत कायदा पास करावा, या मागण्यांसाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांचं उपोषण बुधवारी म्हणजेच पाचव्या दिवशीही सुरू होतं. जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्यानं त्यांची तब्येत खालावली आहे. डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेण्याची त्यांना विनंती करण्यात आली. पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. बुधवारी (ता.१४) सकाळपासून त्यांची तब्येत जास्त खालावली. त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. वडीगोद्री आणि परिसरात महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळाला. तर सोलापूर, धाराशीव, परळी, बीड, हिंगोली, अहमदनगर, लातूर, आळंदी, मनमाडमध्ये बंदला प्रतिसाद मिळाला. 

राज्यात पावसाची शक्यता?

उत्तर भारतात किमान तापमानातील चढ उतार सुरुच आहेत. तर राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढली आहे. काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील तीन जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com