Rabi Season : रब्बीच्या आशा पावसामुळे पल्लवित

Rabi Sowing : रब्बीत पाऊस कमी असल्याने ज्वारीसारखी कोरडवाहू पिकांचे क्षेत्र वाढेल व बागायती पिकांचे क्षेत्र कमी हाईल असा अंदाज होता.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे रब्बीत कोरडवाहू पीक वाढणार असल्याचा अंदाज गृहीत धरून कांदा व गव्हाचे क्षेत्र कमी होईल व ज्वारीच्या प्रस्तावित क्षेत्रात वाढ करत कृषी विभागाने नियोजन केले होते.

मात्र मागील आठवड्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही प्रमाणात पाणीसाठा वाढला असल्याने कृषीच्या नियोजनात बदलाची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाला पुन्हा बदल करावा लागणार असल्याचे दिसतेय.

Rabi Season
Rabi Season : खरिपानंतर ‘रब्बी’ची आशा मावळली ; सोलापूरात पाणीपातळीही एक मीटरने घटली

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी चार लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. अल्प पावसावर पेरलेली खरिपातील पिके यंदा महिनाभराच्या पावसाच्या खंडाने ८० टक्के वाया गेली.

खरीप हंगाम वाया गेलाच, पण पाऊस नसल्याने रब्बीतही पेरणी होईल की नाही. याची शेतकऱ्यांना चिंता होती. रब्बीत पाऊस कमी असल्याने ज्वारीसारखी कोरडवाहू पिकांचे क्षेत्र वाढेल व बागायती पिकांचे क्षेत्र कमी हाईल असा अंदाज होता.

Rabi Season
Rabi Season : कमी पावसामुळे रब्बी हंगामावर टांगती तलवार

एकेकाळी मोठे क्षेत्र ज्वारीचे असायचे. अलीकडच्या काही वर्षात मात्र ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. गेल्यावर्षीही ज्वारी क्षेत्रात मोठी घट झाली होती. यंदा मात्र पाऊस कमी असल्याने कोरडवाहू भागात ज्वारी वाढेल असे गृहीत धरुन एक लाख हेक्टरने ज्वारीचे क्षेत्र वाढवले.

गहु, हरभरा याचे क्षेत्र कमी केले. कांद्याची किती लागवड होईल याचे नियोजनात समावेश नसतो. मात्र यंदा कांदा कमी होईल असे गृहीत धरुन अन्य पिकांचे नियोजन केले होते. मात्र सप्टेंबरअखेर बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने नियोजन बदलणार आहे.

Rabi Season
Rabi Season : रब्बी क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढविण्याचे ‘कृषी’चे उद्दिष्ट

रब्बीसाठी प्रस्तावित क्षेत्र व कंसात सरासरी क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी ः २,१५,००० (२,६७,८००), गहु ः ४५, ०००(८६,४००), मका ः ७४,००० (१४,१००), हरभरा ः ६०,००० (८८३००), करडई ः ७० (३००), तीळ ः १८० (२), जवस ः २०० (१५), सूर्यफूल ः १०० (३१).

रब्बीत आधी पाऊस कमी असल्याने त्यानुसार पेरणी होणाऱ्या पिकांचे क्षेत्र अंदाजित धरुन रब्बीसाठी प्रस्तावित केले होते. गणेश उत्सवाच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मात्र आता पुन्हा पीक पद्धतीत बदल होणार असल्याने त्यानुसार खते, बियाणे उपलब्धतेसाठी नियोजन करावे लागले.
- अमृत गांगर्डे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com