Rabi Season : आटलेले जलस्रोत अन्‌ रब्बीच्या नियोजनाचे आव्हान

Water Crisis : नांदगाव तालुक्यात माणिकपुंज वगळता अन्य धरणे तलाव व नालाबंडींग अद्यापही कोरडेठाक आहेत. त्यामुळे सगळी मदार माणिकपुंज, चांदेश्वरी, गळमोडी येथील पाण्यावर निर्भर आहे.
Nandgoan Water Crisis
Nandgoan Water Crisis Agrowon

Nakik News : तालुक्यात सर्वांत कमी  पर्जन्यमान झाल्याने दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. एकीकडे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात असताना त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दुसरीकडे माणिकपुंज धरणात अवघा पस्तीस टक्के साठा परतीच्या पावसामुळे उपलब्ध झाला असला तरी येत्या मे-जूनपर्यंत त्यातील पाणी जपायचे कसे? असा कळीचा मुद्दादेखील उभा राहिला आहे. त्यामुळे आटलेले जलस्रोत अन्‌ रब्बीच्या नियोजनाचे आव्हान यंत्रणेसमोर असेल.

Nandgoan Water Crisis
Water Issue : समन्यायी पाणीवाटप प्रश्‍न ऐरणीवर

नांदगाव तालुक्यात माणिकपुंज वगळता अन्य धरणे तलाव व नालाबंडींग अद्यापही कोरडेठाक आहेत. त्यामुळे सगळी मदार माणिकपुंज, चांदेश्वरी, गळमोडी  येथील पाण्यावर निर्भर आहे. माणिकपुंज धरणात सध्या २७७ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. तर नाग्यासाक्या धरणात अवघे ९१ दशलक्ष घनफूट एवढाच जलसाठा शिल्लक असून तो देखील एकूण मृत साठ्याच्या निम्मे एवढाच आहे.

Nandgoan Water Crisis
Water Crisis : साताऱ्यात टँकर स्थिती ‘जैसे थे’

लोहशिंगवे जलाशयात पाच, रणखेड्याला अडीच, भालुरला पाच दशलक्ष घनफूट एवढाच अल्पसा तोही मृतसाठा शिल्लक आहे. मांडवडवाडी व पोखरीचे जांभुळबेट हे कोरडेठाक आहेत. एकूणच तालुक्यातील जलस्रोत आजमितीला असून नसल्यासारखे आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाला कसे सामोरे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावीत आहे.

रोज ३५ टँकरच्या माध्यामातून पाणीपुरवठा
सध्या तालुक्यातील वाखारी, शास्त्रीनगर, बोयेगाव, खादगाव, धोटाणे खुर्द, लक्ष्मीनगर, भार्डी, हिसवळ खुर्द, नागापूर, पांझणदेव, माळेगाव(क), बेजगाव, वंजारवाडी, सटाणे, मल्हारवाडी, कऱ्ही, वडाळी बुद्रूक, पानेवाडी, मोहेगाव, धनेर, बाणगाव खुर्द, अस्तगाव, मांडवड, एकवाई, मोरझर,

बाणगाव बुद्रूक, जळगाव खुर्द, अनकवाडे, भौरी, हिसवळ बुद्रूक, दहेगाव, सोयगाव, खिर्डी, भालूर, टाकळी बुद्रूक, साकोरा आदी ३४ गावे व त्यातील एकूण १६० हून अधिकच्या वाड्या वस्त्यांना ३५ टँकरच्या माध्यमातून नव्वद ९० फेऱ्या सुरु आहेत. नजीकच्या काळात त्यात अजून वाढ होईल. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा नोव्हेंबर पर्यंत पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com