Shaktipeeth Highway Farmers Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा विधानभवनावर धडक मोर्चा

Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे प्रमुख गिरीश फोंडे, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत.
Shaktipeeth Highway Farmers Protest
Shaktipeeth Highway Farmers Protestagrowon
Published on
Updated on

Farmers Protest Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. ठेकेदाराला पोसण्यासाठी तयार केला जाणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या पोटावरून जाऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेत बुधवारी (ता. १२) मुंबईतील आझाद मैदानावरून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आझाद मैदान येथे हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे प्रमुख गिरीश फोंडे, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत.

यावेळी समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, "या महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यांची एकजूट अबाधित आहे. सर्व शेतकरी बंधुभाव ठेवून एकमेकांसाठी मुंबईसाठी आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या शेतातील देठाला देखील धक्का लावू नये असे आदेश काढले. मात्र हे सरकार रयतेची जमीनच काढून घेत आहे. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची चर्चा करतो म्हणतात पण कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना विरोधात संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घ्यायला लावतात. आतापर्यंतचे सर्वात भित्रे मुख्यमंत्री फडणवीस आहेत." असे फोंडे म्हणाले.

Shaktipeeth Highway Farmers Protest
Kolhapur Farmers Aggressive: कामे महामार्गांची वेठीस धरला जातोय शेतकरी, महामार्गांविरोधात कोल्हापुरात २ ठिकाणी आंदोलने

विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून या महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. दरम्यान, महायुतीच्या अनेक नेत्यांनी हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणार नाही, अशा घोषणा केल्या होत्या. निकालानंतर काही दिवसांत शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. त्यामुळे हा मार्ग आता वादाचा मुद्दा बनला आहे. मार्गासाठी भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही, तसेच हा महामार्ग शेतकऱ्यांच्या पोटावरून जाणार आहे. त्याला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शक्तिपीठ विरोधात घोषणा

मोर्चासाठी शेतकरी बांधव मंगळवारी (ता.११) सायंकाळी मुंबईला रवाना झाले. हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात एकत्र येऊन त्यांनी शक्तिपीठ विरोधात घोषणा दिल्या. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, वर्षा, अन्य जिल्ह्यांतील कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरला वळसा घालून जाणार?

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा प्रचंड विरोध होत आहे. कोल्हापूरकरांच्या या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अखेर आता कोल्हापूरमधील प्रस्तावित संरेखन वगळून शक्तिपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी पर्यायी संरेखन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ८०५ किमी लांबीचा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग एमएसआरडीसीने प्रस्तावित केला आहे. या महामार्गाचे संरेखन अंतिम झाले असून लवकरच भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे या महामार्गाला कोल्हापूरसह अन्य काही भागातील शेतकरी, जमीन मालकांचा प्रचंड विरोध आहे. हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले. मात्र राज्य सरकार आणि एमएसआरडीसी महामार्ग मार्गी लावण्यावर ठाम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com