Bhima Krushi Pradarshan : भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २६ पासून सुरूवात, 'हे' असणार खास आकर्षण

Agriculture Exhibition : भीमा प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. तसेच देशभरातील विविध जातीची जनावरे यात सहभागी होणार आहेत.
Bhima Krushi Pradarshan
Bhima Krushi Pradarshanagrowon
Published on
Updated on

Kolhapur Bhima Pradarshan : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकाच छताखाली अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कृषी-पशु प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात असलेल्या मेरी वेदर मैदानावर शुक्रवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर समारोप २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे आयोजक खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. प्रदर्शनाचे हे १५ वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडिक म्हणाले, 'या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. तसेच देशभरातील विविध जातीची जनावरे यात सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांचे शेती, उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान असलेल्या स्टॉलचा सहभाग असेल. प्रदर्शनात ४०० पेक्षा जास्त स्टॉल्स असतील. यापैकी २०० स्टॉल्स हे महिला बचत गटांना मोफत दिले जातील.

बचत गटांच्या स्टॉल्समधून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय दररोज विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने असतील. तर सायंकाळी उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी पहायला मिळणार आहे. रिलायन्स इंड्रस्ट्रीज हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.'

Bhima Krushi Pradarshan
Krushi Holic : ‘कृषी होलिक’तर्फे गोमय गणेश, दुग्धजन्य पदार्थांची विक्री

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २६) दुपारी तीन वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह महायुतीतील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. प्रदर्शनकाळातील एका दिवशी पाच महिला जिजामाता शेतीभूषण पुरस्कारासह शेतकरी, कृषी सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव पुरस्कार देऊन काहींना गौरवण्यात येणार आहे.

प्रदर्शनाची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २९ जानेवारीला सायंकाळी चार वाजता होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प कपिल पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अरूंधती महाडिक, शौमिका महाडिक आदी उपस्थित ट्र रहाणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रा. जे. पी. पाटील, रिलायन्सचे सत्यजित भोसले, अ डॉ. विजय शिंदे, डॉ. सुनील काटकर, सर्जेराव धनवडे आदी उपस्थित होते.

१० कोटींचा रेडा आकर्षण

बिहार आणि उत्तर प्रदेशातील विविध प्रदर्शनात लाखोंची बक्षिसे जिंकलेल्या हरियाणा येथील 'गोलू २' हा दहा कोटींचा रेडा प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल. या रेड्याच्या सिमेन्स विक्रीतून महिन्याला १५ लाख रुपये मिळतात. याशिवाय विविध जातीचे बैल, गायी, पक्षी यांचीही प्रदर्शनात रेलचेल असेल, अशी माहिती महाडिक यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com