Poultry Shed Management : असा रोखा पोल्ट्री शेडमधील रोगांचा प्रसार

Poultry Shed : रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा पोल्ट्री उत्पादकांचं नुकसान होतं. हे नुकसान कमी करण्यासाठी रोगाचा प्रसार होणार नाही यासाठी रोगप्रतिबंधात्मक पद्धतींचं पालन करणं आवश्यक असतं.
  Poultry Shed
Poultry Shed Agrowon
Published on
Updated on

Poultry Management : रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा पोल्ट्री उत्पादकांचं नुकसान होतं. हे नुकसान कमी करण्यासाठी रोगाचा प्रसार होणार नाही यासाठी रोगप्रतिबंधात्मक पद्धतींचं पालन करणं आवश्यक असतं.लसीकरण, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसोबत जैवसुरक्षेच्या पद्धती वापरून शेडमध्ये रोगांचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

अपुऱ्या जैवसुरक्षेमुळे बऱ्याच वेळा गंभीर आजार पसरू शकतात , त्यामुळे कोंबड्यांचे विलगीकरण आणि लसीकरण गरजेचे असते. याशिवाय लसीकरण आणि वेळोवेळी रक्ताचे परीक्षण आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करू शकते.

आजाराच्या प्रसाराचे स्रोत

पोल्ट्री शेडमध्ये आजार त्याठिकाणी वावरणाऱ्या लोकांमार्फत पसरू शकतो, जसं की कर्मचारी, सेवा प्रतिनिधी, वाहन चालक, लसीकरण करणारे कर्मचारी आणि पशुवैद्यक.

नवीन आणलेली पिल्ले, पुलेट, प्रजनन करणारे नरांच्या माध्यमातून.

दूषित आणि अस्वच्छ परिसरामुळे रोगांचा प्रसार वाढतो.

अंडी किंवा पिल्ले,खरेदी करताना ती रोगमुक्त आहेत का हे तपासण्याची गरज असते. सोबतच त्याठिकाणी लसीकरण झाल्याची नोंद आहे का ? ते पडताळून घ्यावं. पोल्ट्रीशेडमध्ये आजार संक्रमित अंडी किंवा कोंबड्यांपासून पसरू शकतात.

पोल्ट्रीमध्ये उंदीर, जंगली पक्षी, कीटकांचा शिरकाव झाल्यास आजाराचा प्रसार होतो.

आता पाहुया आजार होऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधक उपाय करावेत.

  Poultry Shed
Poultry Management : कसं असावं पोल्ट्री शेडमधील दैनंदिन व्यवस्थापन?

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. फार्ममध्ये वापरण्यात येणाऱ्या कपडे,बूट, टोपी आणि हातमोजे वेगळे ठेवावेत.

शेड व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही पोल्ट्रीला भेट देऊ नये.

पोल्ट्री शेडमध्ये अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये.

परिसर सोडण्यापूर्वी पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या हाताळल्यानंतर, कपडे बदलावेत आणि हात, पाय स्वच्छ धुवावेत.

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीने आवश्यक लागणारे बूट, डोक्यावरील टोपी घालूनच पोल्ट्रीशेडमध्ये प्रवेश करावा.

सर्व वाहनांच्या चाकांचे शेडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करून घ्यावं.

शेडमधील सर्व साहित्य आणि उपकरणे वापरण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यावीत.

सर्व पक्षांच लसीकरण ही एक महत्त्वाची जैवसुरक्षा प्रक्रिया आहे. मरेक्स, न्यूकॅसल, एव्हियन संसर्गजन्य ब्राँकायटिस यासारख्या संसर्गजन्य आजारांवर लसीकरणामुळे नियंत्रण राहतं. त्यामुळे या आजारावर प्रतिबंधात्म लसीकरण करुन घ्यावं.

कोंबड्यांना कोणताही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी शेडमधील वातावरण हवामान बदलानूसार राहील याची काळजी घ्यावी. एखाद्या कोंबडीची मरतूक झाली असेल तर त्याची विल्हेवाट योग्यरीत्या करावी. मरतूक झालेल्या कोंबडीचे योग्य प्रकारे शवविच्छेदन, सूक्ष्मजीव परीक्षण करावं. त्यामुळे झालेल्या आजार कळेल आणि इतर कोंबड्यांमध्ये त्या आजाराचा प्रसार होणार नाही अशा प्रकारे पोल्ट्री शेडमध्ये काळजी घेतल्यास शेडमध्ये रोगांचा प्रसार होणार नाही.

माहिती आणि संशोधन - पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com