Poultry Management : कसं असावं पोल्ट्री शेडमधील दैनंदिन व्यवस्थापन?

Team Agrowon

नवीन पिले आणण्याअगोदर संपूर्ण शेड आणि उपकरणे निर्जंतुक करून घ्यावीत. उत्तम वंशावळीची निरोगी पिले घ्यावीत.

Poultry Heat Stroke | Agrowon

वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण करावे. ताणरहित वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकस व समतोल आहार आणि पुरेसे स्वच्छ पाणी दिल्यास कोंबड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

Poultry Heat Stress | Agrowon

शेडमध्ये कोंबडीच्या मलमूत्र साठत असते. त्यातून मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू उत्सर्जित होत असतो. हे लक्षात घेऊन लिटर व्यवस्थापन काटेकोर असावे. लिटर ओले किंवा अगदी सुके असू नये.

Poultry Heat Stress | Agrowon

वेळोवेळी उपकरणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण गरजेचे असते.

Poultry Heat Stress | Agrowon

शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी नेमून दिलेल्या कामाची क्रमबद्धरित्या अंमलबजावणी करावी. शेडमध्ये दैनंदिन कार्य करताना लहान, तरुण आणि प्रौढ या क्रमाने कोंबड्यांची हाताळणी करावी.

Poultry Farming | Agrowon

खाद्य, पाणी आणि गादीपासून आजार संक्रमित होऊ नये याकरिता योग्य दक्षता घ्यावी. पाणी, खाद्याची भांडी आणि इतर उपकरणे नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक करावीत.

Poultry Heat Stroke | Agrowon

मांसल आणि अंड्यावरील कोंबड्या एकत्र पाळू नये. कोंबड्या आणि वराहांचा संपर्क येऊ देऊ नये. ऑल इन ऑल आउट पद्धतीचा अवलंब करावा.

Poultry Heat Stroke | Agrowon
आणखी पाहा...