Jalgaon News : खानदेशात टँकरची संख्या वाढत्या तापमानासोबत वाढत आहे. अनेक गावे टंचाईच्या छायेत असून, सुमारे ३८ टँकर सध्या सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात २३ टँकर सुरू आहेत. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १५ टँकर सुरू आहेत. मागील १५ दिवसांत टँकरची संख्या वाढत आहे. यंदा पाऊसमान कमी होते. धुळे व नंदुरबारात २०-२० टक्के एवढी पावसाची तूट आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ टक्के पावसाची तूट होती. परतीचा पाऊस आलाच नाही. याचाही फटका बसला.
खानदेशातील ३०० पेक्षा अधिक गावांत सार्वजनिक पाणी योजनांचे जलस्रोत कमी झाल्याने पाणी कपात करावी लागत आहे. गिरणा, पांझरा नदीकाठी ही समस्या अधिक आहे. गिरणा धरणात जलसाठा नाही. नदीत पाणी येते, पण ते वाहून जाते. नदीत वाळू नसल्याने पाण्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे नदीत पाणी येऊनही फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. कारण नदीत पाणी येते व ते वाहून जाते.
कमी पाणी असल्याने रब्बीवरही परिणाम झाला असून, मागील हंगामाच्या तुलनेत ३५ टक्के पेरणी कमी झाली आहे. गिरणा धरणातून २१ हजार हेक्टरला रब्बीसाठी पाणीच मिळाले नाही. या स्थितीत करायचे काय, असा प्रश्न गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोर होता. यात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत आहे.
सातपुडा पर्वत क्षेत्रातही टंचाई वाढली आहे. ही टंचाई नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल व रावेर भागात आहे. सातपुड्यात पाऊस बरा होता. यात सातपुड्यातील गारबर्डी, अभोडा, मंगरूळ व सुकी, मोर, गूळ, धुळ्यातील अनेर या धरणाच्या क्षेत्रात स्थिती बरी आहे.
धरणालगत पाणी आहे. परंतु अन्य भागात टंचाई वाढली असून, या भागात विंधन विहिरी व अन्य उपाययोजना कराव्या लागत आहेत. कारण या भागात विजेची समस्याही आहे. या भागात विहीर अधिग्रहणही करता येत नाही. यामुळे अधिकची अडचण होत आहे.
पारोळ्यातही समस्या गंभीर
जळगावातील पारोळा, चाळीसगाव, बोदवड भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक आहे. खेडीढोक (ता. पारोळा) अलीकडेच टँकर सुरू झाला. येथे चार खेपेत पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्नाला तोंड द्यावे लागण्याचे संकेत आहेत.
तामसवाडी, भोकरबारी, म्हसवे, इंदासी, लोणी या लघू व मध्यम प्रकल्पांच्या यांच्या जलसाठ्यात शंभर टक्के साठा नव्हता. याचाही फटका बसत आहे. पिण्याचा प्रश्न तसेच पशुधन व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच अवकाळी पावसाचा फटका यामुळे तालुका हा पूर्णपणे होरपळला आहे. पाणीटंचाईशी नागरिकांना सामना करावा लागतो आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.