Sangli Milk Production : सांगलीच्या दुष्काळी भागात चारा प्रश्न गंभीर, चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट

Milk Production : सांगली जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या वाढत चालल्याने चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.
Sangli Milk Production
Sangli Milk Productionagrowon

Sangli Milk Production : सांगली जिल्ह्यात जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे तसा जनावरांच्या दुधात घट होत असल्याचे चित्र आहे. चारा टंचाईची समस्या वाढत चालल्याने चार महिन्यांत दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १८ लाख ६५ हजार ४९५ लिटर दूध संकलन होते. मे २०२४ मध्ये पहिल्या पंधरवड्यात सरासरी दूध संकलन १५ लाख २८ हजार लिटरपर्यंत घटले आहे.

चार महिन्यांत तीन लाख ३७ हजार ३५० लिटरनी घट झाली. दिवसाला गाय दूध दोन लाख लिटर प्रतिलिटर दर २५ रुपये आणि म्हैस दूध दीड लाख लिटर दर ५० रुपये दर धरला तरी दिवसाला सुमारे १.२५ कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ग्रामीण भागात जनावरांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत; मात्र दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगावात चार महिन्यांपासून चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

हवामान बदलाचा पशुपालनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दूध उत्पादनातील घट, आजारांचे वाढते प्रमाण, चाऱ्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक आहे. दुसऱ्या बाजूला पशुखाद्य, चाऱ्याचे वाढते दर आणि घसरलेल्या दूध दरामुळे पशुपालकांचे अर्थकारण बिघडले आहे. हवामान बदलामुळे गाय, म्हैस दूध उत्पादनात सातत्य ठेवत नाहीत.

हवामान बदलाचा परिणाम पिके उत्पादन, पाणीटंचाई, मानवी आरोग्यापुरता मर्यादित न राहता पशुपालनावर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे. खाद्य दर, कमी होणारा दूध दर यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत आहे.

Sangli Milk Production
Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

दहा वर्षांतील तापमानातील वाढ, तसेच हिवाळ्यातील कडाक्यामुळे गाईमध्ये ताण दिसतो. पशुखा‌द्याचे ५० किलोचे पोते एक हजार ६५० रुपयांना झाले आहे. दर सहा महिन्यांनी ५० रुपये वाढ आहे. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुधाचा दर सध्या गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर मिळतोय. या दरात उत्पादन खर्च निघणे मुश्कील आहे. व्यवस्थापनाचा खर्च लक्षात घेता प्रतिलिटर दुधाला ४० रुपये दर मिळाला तर कोठे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल.

यावर मिरज पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त भुवनेश्वर बोरकर म्हणाले की, कमाल आणि किमान तापमानात १२ अंशांपेक्षा अधिक फरक पडल्यास मोठ्या प्रमाणात दूध घटते. ते घटू नये यासाठी गोठ्यात खेळती हवा ठेवा. जास्त खिडक्या असाव्यात. जनावरांना दररोज दिवसा अंघोळ घालावी.

जनावरांना पुरेसे आणि दिवसातून तीन-चार वेळा थंड पाणी द्यावे. पाण्यात थोडे मीठ आणि मैदा टाकून जनावरांना द्यावे. शक्य असल्यास जनावरांना सकाळ-संध्याकाळ चारायला पाठवावे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com