Kolhapur Rabi Season : कोल्हापूर जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र कमी होणार, कृषी विभागाने जाहीर केली माहिती

Kharif Season : खरिपाबरोबर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Agriculture Department Kolhapur : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यात अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्याच झाल्या नाहीत. दरम्यान राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळाची स्थिती असल्याचीही माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. सध्या खरिपाच्या हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. तर रब्बी हंगामाच्या पेरण्याचीही लगबग सुरू आहे.

खरिपाबरोबर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगाम क्षेत्र जाहीर केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट आहे. यंदा रब्बीचे २१ हजार हेक्टर क्षेत्र असून, ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मॉन्सूननंतर परतीचा पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती परंतु परतीचा एकही पाऊस झाला नसल्याने पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

दरम्यान रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस नसल्याने माळरानावरील ओलावा कमी झाल्याने पेरण्या होणे अशक्य झाले आहे. हरभरा, उन्हाळी शेंगा यासह रब्बीच्या पिकांना धोका बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे एक हजार हेक्टरने रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season : जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी धोक्यात

हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, तृणधान्य, तेलबिया अशी पिके घेतली जातात. जिल्ह्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्र गतवर्षपेक्षा एक हजार हेक्टरने कमी होईल. गतवर्षी साडेबावीस हजार हेक्टर क्षेत्र होते. यावर्षी २१ हजार २७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे.

गतवर्षी ऑक्टोंबरमध्ये ११३ मिमी. पाऊस झाला होता. यावर्षी ऑक्टोबरमध्ये डोंगरी भागात काही तालुक्यात १८ ऑक्टोबरपर्यंत फक्त ३१ मिमी. पावसाची नोंद झाली. यावर्षी परतीचा पाऊस झाला नाही. जमिनीत ओलावा नसल्यामुळे ओलीवर टाकला जाणारा हरभरा व ज्वारी पिकाची उगवण होणार नसल्याची स्थिती आहे.

पंधरवड्यात ५५० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. रब्बी हंगामात ज्वारीचे ११ हजार ८५४ हेक्टर, गहू १६५० हेक्टर, मका १२९३ हेक्टर, हरभरा ४७७३ हेक्टर, तृणधान्य १५० हेक्टर, तेलबिया १०३ हेक्टर, असे एकूण २१ हजार २७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी कृषी अधीक्षक अरुण भिंगारदेवे म्हणाले की, पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगामात एक ते दोन हजार हेक्टर क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. हातकणंगले, गडहिंग्लज, कागल तालुक्यांत ज्वारीची १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. रब्बी हंगामासाठी हरभरा ज्वारी व इतर धान्याचे बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस व पाण्याची परिस्थिती पाहून पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com