Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही

President S. B. Bhad : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत ठिबक पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा,’’ असे आवाहन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड यांनी केले.
President S. B. Bhad
President S. B. BhadAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘पाणीबचत साधण्याबरोबरच उसाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर ठिबक सिंचनाला पर्याय नाही. ठिबक सिंचनामुळे उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत ठिबक पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा,’’ असे आवाहन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड यांनी केले.

President S. B. Bhad
Irrigation Management : मृग बहरात खत, सिंचन व्यवस्थापनावर विशेष भर

कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या विषयावर दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’ने शनिवारी एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, फलोत्पादन विभागाचे सहसंचालक श्याम फडतरे, संस्थेचे उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, कृषी समितीचे समन्वयक कृषिरत्न डॉ. संजीव माने, कृषी समितीचे सहसमन्वयक डॉ. सुरेश पवार, कार्यकारी सचिव गौरी पवार, मानद सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

President S. B. Bhad
Agriculture Irrigation : ‘ठिबक, तुषार’चे ९ कोटी अनुदान प्रलंबित

फलोत्पादन विभागाचे सहसंचालक श्याम फडतरे म्हणाले, की सरकारच्या सूक्ष्म सिंचनाबाबत शासनाची योजना आहे. या योजनांच्या माध्यमातून ३२.५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे. अधिकतम ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवता येऊ शकते, या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. सुधीर भोंगळे म्हणाले, की भारतातील एकूण जलस्थितीचा आढावा घेताना, भविष्यात सर्वांना गंभीर पाणीसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाखेरीज सध्या दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले. डॉ. संजीव माने यांनी प्रस्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com