Agriculture Irrigation : ‘ठिबक, तुषार’चे ९ कोटी अनुदान प्रलंबित

Irrigation Subsidy Update : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक व तुषार संचाचे मिळून ४७१ लाभार्थी शेतकऱ्यांना ९५ लाख ३ हजार ६२३ रुपये एवढे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक व तुषार संचाचे मिळून ४७१ लाभार्थी शेतकऱ्यांना ९५ लाख ३ हजार ६२३ रुपये एवढे अनुदान वाटप करण्यात आले आहे. अजून ५ हजार १७९ शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ८० हजार ४१३ रुपये एवढे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पर ड्रॉप मोअर क्रॉप) सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक व तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आलेल्या अर्जातून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. या अंतर्गत २०२३-२४ या वर्षी अनुदानासाठी सोडत काढून जिल्ह्यातील २० हजार ५२८ शेतकऱ्यांच्या अर्जांची निवड करण्यात आली होती.

Agriculture Irrigation
Smart Irrigation : स्मार्ट सिंचन पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

त्यापैकी १५९ अर्ज नाकारण्यात आले, तर १३ हजार १७५ अर्ज रद्द करण्यात आले. एकूण ७ हजार १९४ अर्ज अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत आहेत. त्यापैकी ७ हजार ४६ अर्जदार शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार संच खरेदी बाबतचे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली आहेत. त्यापैकी ६ हजार १४८शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. १०९ शेतकऱ्यांचे मोजमाप पुस्तिका पूर्ण करण्याची राहिली आहे.

पडताळणीनंतर एकूण ५ हजार ६५६ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात संमती देण्यात आली आहे. एकूण ३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा तपशिल चुकीचा असल्यामुळे अनुदान वितरणास अडचण येत आहे. २०२३-२४ मध्ये आजवर ४७१ शेतकऱ्यांना ९५ लाख ३ हजार ६२३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Agriculture Irrigation
Smart Irrigation : एआय आधारित स्मार्ट सिंचन पद्धतीचे फायदे

२०२२-२३ मध्ये ६ हजार ९२९ शेतकऱ्यांना १२ कोटी २९ लाख २६ हजार २३४ रुपये व २०२१-२२ मध्ये ८ हजार ४८६ शेतकऱ्यांना १५ कोटी १४ लाख ९७ हजार ६५६ रुपये असे तीन वर्षांमध्ये एकूण १५ हजार ८८६ शेतकऱ्यांना २८ कोटी ३९ लाख २७ हजार ५१३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पीएमएसकेवाय २०२३-२४ सूक्ष्म सिंचन

अनुदान वितरण स्थिती (रक्कम लाख रुपये)

तालुका अनुदान प्रक्रियेतील शेतकरी अनुदान प्राप्त

शेतकरी अनुदान रक्कम

परभणी ९४८ २१ २.७९

जिंतूर ९६५ ५७ ७.३६

सेलू ५९८ ८७ १२.९०

मानवत ५७३ ११ १.३०

पाथरी ५५८ ११ १.५३

सोनपेठ ३११ ४ ०.३३६४

गंगाखेड ६ ४५१ ०.५३

पालम ३१४ २४८ ६४.४०

पूर्णा ४८५ ७ ०.८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com