Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

Manjra Slit Update : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात नेमका किती गाळ याच्या आकडेवारीतच घोळ असल्याचे दिसून येत आहे.
Manjra Dam
Manjra DamAgrowon

Latur News : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात नेमका किती गाळ याच्या आकडेवारीतच घोळ असल्याचे दिसून येत आहे. १९८० मध्ये मांजरा धरणात पाणी साठा सुरु झाला. त्यानंतर वर्षांनी धरणातील गाळाचे सर्वेक्षण झाले. पण याला मान्यताच मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पण या सर्वेक्षणानुसार धरणात २५.५९ दशलक्षघनमीटर गाळ गृहीत धरण्यात आला आहे. तर आता २०२२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात धरणात आतापर्यंत एकूण गाळ १६.५९ दशलक्ष घनमीटर गाळ साठला असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Manjra Dam
Water Conservation : बुलडाणा जिल्ह्यात १७७ जलाशये घेणार मोकळा श्‍वास

सर्वेक्षणाला मान्यताच नाही

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यासाठी मांजरा धरण महत्त्वाचे आहे. त्यात लातूर शहराला या धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे.

१९८० पासून या धरणात पाणीसाठा केला जात आहे. नाशिकच्या मेरी संस्थेच्या वतीने २००२ मध्ये धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालाला छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांची मान्यता घेणे आवश्यक असते. पण याकडे ना संस्थेने ना जलसंपदा विभागाने लक्ष दिले. त्यामुळे या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली नसल्याची बाब आता समोर आली आहे.

मान्यता नसताना आकडेवारीचा खेळ

या सर्वेक्षणाला मान्यता मिळालेली नाही. असे असताना जलसंपदा विभागाच्या वतीने २००२ पासून पाण्याच्या आकडेवारीचा खेळ सुरु आहे. २००२ पर्यंत या धरणाची एकूण साठवण क्षमता २५० दशलक्षघनमीटर होती.

ती २००२ पासून २२४ दशलक्षघनमीटर दाखवली जात आहे. म्हणजेच जलसंपदा विभागाने धरणात २६ दशलक्ष घनमीटर गाळ गृहीत धरुन आकडेवारीचा मांडला आहे.

Manjra Dam
Dam Slit : शेतकऱ्यांसाठी धरणातील गाळ मोफत उपलब्ध

बावीस वर्षानंतर पुन्हा सर्वेक्षण

मांजरा धरणाचे पहिल्यांदा २००२ मध्ये पहिल्यांदा गाळ सर्वेक्षण झाले. त्यानंतर बावीस वर्ष या धरणाकडे कोणी फिरकलेही नाही. २००२ मध्ये पुन्हा नाशिकच्या मेरी संस्थेच्या पथकाने या धरणाचे सर्वेक्षण केले आहे. या करिता रडार यंत्रणा तसेच सॅटेलाईट यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. याचा अहवाल त्यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे.

गाळाच्या नवीन आकडेवारीचा खेळ

या धरणातील गाळाचे २००२ मध्ये मेरी संस्थेने सर्वेक्षण केले. पण त्याला मान्यता नसल्याने तो अहवाल या संस्थेने २०२२ च्या सर्वेक्षणाच्या वेळी नाकारला आहे. १९८० हे बेस वर्ष पकडून त्यांनी आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार धरणात दरवर्षी ०.३९५ दशलक्षघनमीटर गाळ येत आहे.

आकड्यांच्या घोळात पाण्याचा हिशेब लागेना

या धरणातील गाळाच्या आकड्याच्या घोळात पाणी साठ्याच्या आकडेवारीवर परिणाम होताना दिसत आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार २००२ मध्येच धरणात २६ दशलक्षघनमीटर गाळ होता. पुढील बावीस वर्षात हा गाळ दुप्पट होणे अपेक्षीत आहे. तर मेरीच्या २०२२ च्या अहवालानुसार धरणात एकूणच गाळ १६.५९ दशलक्षघनमीटर इतका आहे.

या आकडेवारीच्या घोळात धरणात नेमका पाणीसाठा किती याची खरी आकडेवारी देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगता येत नसल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ पातळीवरच लक्ष दिले पाण्याच्या नियोजनाशी खरी आकडेवारी समोर येण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com