Fertilizer subsidy : नॅनो खतांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही; केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती

fertilizer department : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या लोकसभेत नॅनो युरियाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी (ता.७) लेखी उत्तरात मंत्री पटेल यांनी माहिती दिली. यावेळी सध्या कोणतेही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून नॅनो युरियासाठी योजने आणण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Union Minister Anupriya Patel
Union Minister Anupriya PatelAgrowon
Published on
Updated on

Union Minister Patel : केंद्र सरकारने नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जागरूकता मोहीम राबवली. शिबिर, वेबिनार, पथनाट्य, शेतातील प्रात्यक्षिक, शेतकरी परिषदा आणि प्रादेशिक भाषांमध्ये चलचित्र असे विविध उपक्रम राबवल्याची माहिती केंद्रीय रसायने आणि खत राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या लोकसभेत नॅनो युरियाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी (ता.७) लेखी उत्तरात मंत्री पटेल यांनी माहिती दिली. यावेळी सध्या कोणतेही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून नॅनो युरियासाठी योजने आणण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पटेल यांनी देशात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सभागृहात सांगितलं. पटेल म्हणाल्या, "खत कंपन्यांच्या सहकार्याने देशातील सर्व १५ कृषी-हवामान विभागात सल्लामसलत आणि क्षेत्रीय पातळीवरील प्रात्यक्षिकांद्वारे नॅनो डीएपीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. तसेच देशातील १०० जिल्ह्यांमध्ये नॅनो युरिया प्लसचे क्षेत्रीय पातळीवरील प्रात्यक्षिक आणि जागरूकता कार्यक्रमांसाठी एक मोहीम सुरू केली आहे." असं पटेल म्हणाल्या.

Union Minister Anupriya Patel
Fertilizers Shortage: जळगावातील खतांच्या लिकिंग, टंचाईमुळे शेतकरी हैराण

सध्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रावर उपलब्ध करून दिले जातात. तसेच खत विभागाने नियमितपणे जाहीर केलेल्या महिन्याचा पुरवठा योजनेत देखील नॅनो युरियाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री पटेल यांनी दिली. तसेच नुकतीच भोपाळ येथील भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या माध्यमातून आयसीएआरने खतांचा कार्यक्षम आणि संतुलित वापर यावर राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केल्याचंही सांगितलं.

सध्या खत विभागाकडून अनुदानाची कोणतीही तरतूद नसून ड्रोनद्वारे नॅनो खतांची फवारणी ही एक फायदेशीर पद्धत म्हणून समोर आली आहे. विकासित भारत संकल्प यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी फवारणीच्या या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात पसंती दिली आहे, असंही पटेल यांनी सांगितलं.

Union Minister Anupriya Patel
Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या विकासित भारत संकल्प यात्रेदरम्यान नॅनो खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. पानांवरील नॅनो युरियासारख्या नॅनो खतांचा वापर आणि वापर सुलभ करण्यासाठी ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी आणि किरकोळ दुकानांमध्ये बॅटरीवर चालणारे स्प्रेअर वाटप असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उद्देशासाठी, गावपातळीवरील उद्योजकांमार्फत पायलट प्रशिक्षण आणि फवारणी सेवांना प्रोत्साहन दिलं जात, असल्याचा दावाही पटेल यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com