Voter Update : पुरंदरमध्ये ४.५८ लाख मतदार

Vidhansabha Election 2024 : पुरंदर मतदारसंघात चार लाख ५८ हजार २८२ मतदार असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २ हजार १९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
Voter
VoterAgrowon
Published on
Updated on

Saswad/Malshiras News : पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह एका सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. दरम्यान, पुरंदर मतदारसंघात चार लाख ५८ हजार २८२ मतदार असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २ हजार १९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी पहिला मजला, प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय सासवड (पुरंदर) येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याच इमारतीत मतमोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मतदारांची संख्या

पुरुष : २,३८,००१

महिला : २,२०, २४९

इतर : ३२

एकूण : ४,५८,२८२

Voter
Vidhansabha Election 2024 : मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

मतदारांचे प्रकार

दिव्यांग : ४०७५

८५ पेक्षा जास्त वय असलेले : ८४२८

सैनिक मतदार : ६१३

Voter
Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार
पुरंदर विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासन यंत्रणेकडून पूर्ण झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार काळात आक्षेपार्ह विधाने, सोशल मीडिया व पेड न्यूज यावर लक्ष ठेवण्यासाठी विविध स्वतंत्र पथके नेमली आहेत. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण करून खर्चात आलेली तफावत, याचे निरीक्षण करण्यासाठीही पथके नेमली आहेत
वर्षा लांडगे, निवडणूक निर्णय अधिकारी, पुरंदर विधानसभा मतदारसंघ

अशी आहे तयारी

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २,१९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रस्तावित.

मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड (पुरंदर) येथे सुरक्षाकक्ष.

मतदान साहित्य वाटप व मतदान साहित्य स्वीकारण्याची व्यवस्थाही नवीन प्रशासकीय इमारतीतच.

४१३ मतदान केंदांवर मतदान प्रक्रिया पार पडणार.

मतदान केंद्रांवर वीज, पाणी व उन्हापासून संरक्षणासाठी व्यवस्था परिस्थितीनुसार करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com