Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024Agrowon

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
Published on

Buldhana News: जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील दोन हजार २८८ मतदान केंद्रांवर २० नोव्हेंबरला मतदान होईल. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, यंदा या निवडणुकीत सुमारे २१ लाख २४ हजार २२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुवासिनी गोणेवार उपस्थित होत्या.

जिल्हा प्रशासनाचे ७० टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नसून, मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे.

(ॲग्रो विशेष)

Vidhan Sabha Election 2024
Vidhansabha Election 2024 : मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

तसेच ज्या मतदारांचे नाव मतदान यादीत नाही अशा मतदारांनी मंगळवार (ता. २९) पर्यंत मतदान केंद्रावर किंवा ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. ...अशी आहे मतदारांची संख्या जिल्ह्यात २१ लाख २४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यामध्ये पुरुष मतदार ११ लाख ५ हजार १९३, तर महिला मतदार १० लाख १८ हजार ९९६, तर तृतीयपंथी मतदार ३८ आहेत. मलकापूर विधानसभा मतदार दोन लाख ८७ हजार ४४५, बुलडाणा तीन लाख ५ हजार ६८५, चिखली तीन लाख ३ हजार ३९०, सिंदखेड राजा तीन लाख २१ हजार ११५, मेहकर तीन लाख ५ हजार ०५३, खामगाव दोन लाख ९६ हजार ६०५ आणि जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात तीन लाख ४ हजार ९३४ मतदार आहेत.

२२२८ मतदान केंद्रे

निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार २२८ मतदान केंद्र आहेत. मलकापूरमध्ये ३०५, बुलडाणा येथे ३३७, चिखली ३१७, सिंदखेड राजा ३४०, मेहकर ३५०, खामगाव ३२२, तर जळगाव जामोद येथे ३१७ असे एकूण २२२८ मतदान केंद्रे आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सीमेवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सीमेवर दोन पोस्ट असणार असून, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलिस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. सोशल मीडियावरही विशेष लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com