Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

Beed News : भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम (ता. १५) घोषित केला आहे. घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Vidhansabha Election 2024: जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज व परळी असे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या सहाही मतदार संघात एकूण २१ लक्ष ९७ हजार ८३० मतदार आहेत. त्यामध्ये १५ लक्ष ५८ हजार ९९८ पुरुष, १० लक्ष ३८ हजार ८०९ महिला मतदार आहेत. तृतीय पंथी मतदार २३ आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम (ता. १५) घोषित केला आहे. घोषित केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी श्री. पाठक यांनी बुधवारी (ता. 16) माहिती दिली.

जिल्ह्यातील मतदारांमध्ये दिव्यांग मतदार 9 हजार २७२ आहेत. ज्यामध्ये 5 हजार ९८४ पुरुष, तीन हजार २८८ महिला मतदार आहेत. वय वर्ष ८५ हून अधिक मतदार ३८ हजार १४० आहेत, ज्यामध्ये १५ हजार ५२० पुरुष, २२ हजार ६२० महिला आहेत.

यासह संवेदनशील मतदान केंद्रे, बॅलट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, पोलिस पथके, निमलष्करी पथके, स्थिर पथके आदींची माहितीही श्री. पाठक यांनी दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने संकलित करण्यात आलेल्या निवडणुकीशी संबंधित आवश्यक माहितीची संदर्भ पुस्तिकाही देण्यात आली.

(ॲग्रो विशेष)

Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024 : मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे ः पाठक

बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बीडचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मतदारांना केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.पाठक बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, प्र. अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, बीड विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांची उपस्थिती होती. शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक - २२ ऑक्टोबर २०२४

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक - २९ ऑक्टोबर २०२४

नामनिर्देशन पत्रांची छाननी - ३० ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक - ४ नोव्हेंबर २०२४

प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक - २० नोव्हेंबर २०२४

मतमोजणी दिनांक - २३ नोव्हेंबर २०२४

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - २५ नोव्हेंबर २०२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com