Agriculture Pump Cable
Agriculture Pump CableAgrowon

Agriculture Pump Cable Theft : भराडी बंधाऱ्यानजीक कृषिपंपाच्या विद्युत केबलची चोरी

Theft Issue : भराडी (ता. आंबेगाव) येथील घोडनदी तीरावरील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची विद्युत केबलची चोरी झाली आहे.
Published on

Pune News : भराडी (ता. आंबेगाव) येथील घोडनदी तीरावरील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची विद्युत केबलची चोरी झाली आहे. अंदाजे ६०० ते ६५० फूट केबलची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बुधवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Agriculture Pump Cable
Agriculture Pump Theft : कृषिपंपांच्या केबल, ठिबक चोरीचे सत्र थांबेना

भराडी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक मोठ्या प्रमाणात कृषीपंप आहेत. गेल्या तीन वर्षांत हजारो फूट केबल तसेच कृषी पंपातील तांब्याच्या तारादेखील चोरीला गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही.

Agriculture Pump Cable
Cable Theft : दुष्काळी परिस्थितीत केबल चोरीचे नवे संकट

बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी भराडी बंधाऱ्यानजीक असलेल्या सचिन खंडू खिलारी, विठ्ठल सावळेराम खिलारी, चिमाजी शंकर मोरे, संदीप थोरात, रवींद्र मोरडे, संजय खिलारी या सहा शेतकऱ्यांची जवळपास ६०० ते ६५० फूट केबल चोरून नेली आहे.

गुरुवारी सकाळी १० वाजता शेतकरी संतोष मोरे हे कृषीपंप सुरू करण्यासाठी आले असता, तो सुरू झाला नाही. त्यांनी परिसरात पाहणी केली असता केबलच गायब असल्याचे आढळून आले. सर्व शेतकऱ्यांनी चोरीची माहिती पोलिस पाटील संतोष खिलारी यांना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com