Mango Verity Name : आंब्याच्या जातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं नाव

उत्तर प्रदेशातील लखनऊजवळच्या मलिहाबाद हे जेमतेम २० हजार लोकसंख्या असेलेलं गाव आंबा शेतीसाठी प्रसिध्द आहे. या गावामध्ये हजारो आंब्यांची झाडे आहेत.
Mango Veriety
Mango VerietyAgrowon
Published on
Updated on

Mango Cultivation : उत्तर प्रदेशातील लखनऊजवळच्या मलिहाबाद हे जेमतेम २० हजार लोकसंख्या असेलेलं गाव आंबा शेतीसाठी (Mango Farming) प्रसिध्द आहे. या गावामध्ये हजारो आंब्यांची झाडे आहेत. या गावाजवळच भारत सरकारचे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टीकल्चर (Central Institute Of Subtropical Horticulture) ही संशोधन संस्था आहे.

या संस्थेच्या परिसरातच एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दलची माहिती या संस्थेला नव्हती. तब्बल ८२ वर्षे वयाच्या या शेतकऱ्याचे नाव आहे कलिमउल्लाह खान. (Kalimullah Khan)

एकाच आंब्याच्या झाडाला कलम करून ३०० प्रकारची विविध चवीची, आकाराची आणि सुवासाची फळे येतात, ही किमया कलिमउल्लाह खान यांनी करून दाखवली आहे. कलिमउल्लाह यांनी कलमिकरणाद्वारे आंब्याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. त्यातीलच एका आंब्याच्या जातीला त्यांना क्रिकेट विश्वातला तारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे नाव दिले आहे.

आंब्याच्या जातीला सचिनचे नाव

सचिनच्या नावाने विकसित केलेल्या या आंब्याचा आकार मोठा असून याची कोय मात्र छोटी आहे. आंब्यातील कोयचा आकार छोटा असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गर असतो. ही आंबा चवीला दशहरी आणि चौसा जातीच्या आंब्यापेक्षा कमी गोड आहे. मात्र, या जातीपासून आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

Mango Veriety
Mango Production : विदर्भातील शेतकरी मराठवाड्यातील आंबा उत्पादकाच्या बांधावर

कलिमउल्लाह खान यांनी १९८७ पासून ते आता २०२३ पर्यंत जवळपास ३०० हून अधिक आंब्याच्या जाती विकसित केल्या आहेत. ज्या प्रमाणे हाताची पाचही बोटे एकसारखी नसतात त्याचप्रमाणे त्यांनी विकसित केलेल्या कोणतीही आंब्याची जात एकसारखी नसल्याचा त्यांच्या दावा आहे.

२०१३ साली सचिनने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्यानंतर खान यांनी आंब्याची नवी जात विकसित करून त्याला सचिनचे नाव दिले. सचिनच्या नावाने विकसित केलेल्या आंब्याची मोठी चर्चा आहे.

Mango Veriety
Hapus Mango Market : ऐन हंगामात हापूसची आवक घटली

अनेक महान व्यक्तींच्या नावे आंब्याच्या जाती विकसित

कलिमउल्लाह खान यांनी देशामधील राजकीय, सामाजिक, खेळ, कला, विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींची नावे त्यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या कलमांना दिली आहेत.

यामध्ये २०१४ चे नमो कलम, सचिन कलम, ऐश्‍वर्या रॉय, अनारकली, अखिलेश यादव, अमित शहा, योगी आदित्यनाथ, अब्दुल कलाम, सोनिया गांधी कलम अशी नावे या कलमांना दिली आहेत.

२००८ ला पद्मत्रश्रीने सन्मानित

मँगो मॅन नावाने प्रसिध्द असलेल्या कलिमउल्लाह खान यांचा जन्म १९४० मध्ये झाला. आपल्या वडिलांच्या सानिध्यात त्यांनी आंबा कलम करण्याची कला अवगत केली.

आंब्याच्या ३०० हून जाती खान यांनी विकसित केल्या आहेत. यासाठी त्यांना २००८ साली देशातील प्रतिष्ठित अशा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com