Shriguru Paduka Darshan Utsav : भक्ती, शक्ती संगमातून साकारेल विश्‍वमंदिर

Managing Director of Sakal Group Abhijit Pawar : भक्ती आणि शक्ती एकत्रित आल्यास संपूर्ण विश्वच मंदिर होईल,’’ असे प्रतिपादन ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी बुधवारी केले.
Managing Director of Sakal Group Abhijit Pawar
Managing Director of Sakal Group Abhijit Pawar Agrowon

New Mumbai News : ‘‘गुरूंच्या पादुका विसावल्यापासून सिडको एक्झिबिशन सेंटरला जणू मंदिराचे स्वरूप आले. गुरुसेवकांच्या मनातील भक्तीचे दर्शन घडले. भक्ती आणि शक्ती एकत्रित आल्यास संपूर्ण विश्वच मंदिर होईल,’’ असे प्रतिपादन ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी बुधवारी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ‘श्री फॅमिली गाइड प्रोगॅम’अंतर्गत ‘श्री गुरू पादुका दर्शन उत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याची बुधवारी सांगता झाली, त्यापूर्वी पवार यांनी मार्गदर्शन केले.

‘‘आज सकाळी जेव्हा मी गुरू श्री एम यांच्यासोबत येथे आलो, तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ पोहोचल्यानंतर तिथे बालवारकरी अत्यंत सुंदर भजनात तल्लीन झालेले दिसले. भान हरपून नाचत होते. त्या बालवारकऱ्यांच्या भक्तिरसात श्री एम गुरूदेखील तल्लीन होऊन एकरूप झाले. या वेळी मला जणू विठ्ठलच श्री एम गुरूंच्या रूपातून नाचतो आहे की काय असे वाटले. अशा भक्तीमय वातावरणामुळे परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.’’

Managing Director of Sakal Group Abhijit Pawar
Shriguru Paduka Utsav : ।। संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ।।

‘‘येथे आलेल्या नागरिकांना आज मी पाहिलं. त्यांच्या डोळ्यात व आचरणात श्रद्धा आणि सबुरी दिसली. पादुका आणि सर्व परिसर पाहताना जसे शेगावला भक्तिमय वातावरण पाहिले तशीच अनुभूती मला येथे आली. येथे जो चिंतन मनन कक्ष बनवला होता, त्यानंतर ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग, सेवामार्ग व लक्ष्मी मार्ग होता. यातून हजारो लोकांना जीवनात काय करायचे आहे याचे उत्तर मिळत होते,,’’ असे पवार म्हणाले.

दरवर्षी उत्सवाचा निश्‍चय ‘‘एकाच वेळी अठरा पादुकांचे दर्शन करता येणे ही संकल्पना अनेकांना आवडली. मात्र ही माझी संकल्पना नसून माझ्या गुरूंची आहे. अनेकांनी हा उत्सव दरवर्षी आयोजित करण्यात यावा, असे सुचविले आहे. आम्हीदेखील हा उत्सव दरवर्षी आयोजित करण्याचा निश्चय केला आहे. या सेवेची संधी मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे,’’ असेही पवार म्हणाले.

Managing Director of Sakal Group Abhijit Pawar
Shriguru Paduka Darshan Utsav : दैवी पर्वणीची सांगता !

हे तर चालते-बोलते मंदिर पवार म्हणाले, ‘‘एक्झिबिशन सेंटरच्या सुरुवातीलाच चप्पल ठेवण्याचा विभाग होता. हा इथला सर्वांत महत्त्वाचा विभाग. लोक चप्पल ठेवत होते, मात्र ते स्वीकारणाऱ्याचा भाव पादुका स्वीकारण्याचा होता. हे घडले कसे, याचा विचार केला तर लक्षात आले की सद््गुरूंवरील भक्तीमुळे हे सारे परिवर्तन घडले आहे. चपलांमध्ये देखील पादुका पाहता येणे यालाच तर परिवर्तन म्हणतात.

सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अशा भक्ती आणि शक्तीचे दर्शन घडले. त्यामुळेच येथील वास्तूला देखील मंदिराचे रूप प्राप्त झाले आहे. यातून एक गोष्ट लक्षात आली की, जर हे एक्झिबिशन सेंटर मंदिरात रूपांतरित होऊ शकते, तर संपूर्ण विश्वात भक्ती आणि शक्ती एकत्र आली तर संपूर्ण विश्व एका मंदिरात रूपांतरित होऊ शकेल.’’ येथे आलेला प्रत्येक व्यक्ती आम्ही पाहत होतो, ते केवळ व्यक्ती नव्हे तर ते चालते-बोलते मंदिर होते, असे मत पवार यांनी मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com