Dam Water Level : इगतपुरीत धरणे उशाला; कोरड घशाला!

Water Crisis : ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना घोर कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Igatpuri News : पावसाच्या माहेरघरीच हंडाभर पाण्यासाठी भरउन्हात अतिदुर्गम भागातील आवळी, ओंडली शिवारातील आदिवासी महिलांना ताटकळत बसण्याची वेळ आली असून, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच आचारसंहितेचा बडगा असल्याने लोकप्रतिनिधींचेही हात बांधले गेल्याने केव्हा एकदाची ही लोकसभा निवडणूक संपेल, याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून लोकसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त, तर शासकीय अधिकारी व सर्वच कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना घोर कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

Water Issue
Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. मायदरा येथील ठोकळवाडी व धारणोली या वाड्यांसह खेडची ठाकूरवाडी वरची व खालची या आदिवासी पाडे व वाड्यांना पाणीटंचाईचे तीव्र चटके बसू लागले आहेत. तालुक्यात बहुतांश गावांना तत्काळ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Summary

खासगी टँकरवरच मदार

पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती शहरातही असून, आठवड्यातून तीनवेळा शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातच ऐन पाणी येण्याच्या वेळी काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे रहिवांशाची चांगलीच तारांबळ उडते. अशावेळी अनेक नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेत आहे.

Water Issue
Water Crisis : संगमनेर तालुक्यामध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा
ओंडली शिवारातील झऱ्यात हंडाभर पाण्यासाठी तासनतास भर उन्हात बसून पाणी भरावे लागते. कसेबसे आम्ही गढूळ पाणी पिऊन तहान भागवतोय. हे पाणी मे महिन्याच्या शेवटी संपते. मात्र, आमच्या समस्या कोणीच सोडवित नाही.
चांगुणाबाई वाघ, महिला शेतकरी
शहरात ज्या ज्या भागात पाणीपुरवठा सुरु केला जातो. त्यावेळी या प्रभागात मुद्दाम वीज खंडीत केली जाते. त्यामुळे आठवडाभर पाणी कसे वापरायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. पाण्याचे राजकारण कोणीही करु नये. विनाकारण पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.
रमेश शिंदे, ग्रामस्थ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com