Agriculture Commodity Market : कापूस, हळदीमधील दरवाढीचा कल कायम

Market Update :सर्वच शेतीमालाची मागणी वाढत आहे. त्यामुळे किमतीही वाढत आहेत. या सप्ताहातही टोमॅटो वगळता इतर सर्वांच्या किमती वाढल्या. कापूस व हळदीमधील दरवाढीचा कल कायम आहे.
Cotton And Turmeric
Cotton And TurmericAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती : सप्ताह १७ ते २३ फेब्रुवारी २०२४

२ फेब्रुवारीपासून हरभऱ्याची आवक वाढत आहे. तुरीची आवक २ फेब्रुवारी रोजी सर्वांत अधिक होती. ही आवक गेल्या वर्षीच्या याच वेळेच्या आवकेपेक्षा अधिक होती. अजूनही ती जवळ जवळ याच पातळीवर आहे. कांद्याची आवक वाढत आहे. इतर सर्व पिकांची आवक कमी होत आहे.

सर्वच शेतीमालाची मागणी वाढत आहे. त्यामुळे किमतीही वाढत आहेत. या सप्ताहातही टोमॅटो वगळता इतर सर्वांच्या किमती वाढल्या. कापूस व हळदीमधील दरवाढीचा कल कायम आहे. त्यामुळे या दोन्ही शेतीमालांचे फ्यूचर्स व्यवहार अधिक प्रमाणात होत आहेत. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ५७,८६० वर आले होते. या सप्ताहात ते १ टक्क्याने वाढून रु. ५८,४६० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव १ टक्क्याने वाढून रु. ६०,४८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स रु. ६२,५४० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७ टक्क्यांनी अधिक आहेत. हेजिंगसाठी हे भाव अनुकूल आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.८ टक्क्याने वाढून रु. १,४३९ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५३१ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा अधिक आहेत.

Cotton And Turmeric
Cotton Export Grant : कापूस उत्पादकांना निर्यात अनुदान द्या : विजय जावंधिया

मका

NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ०.४ टक्क्याने वाढून रु. २,२६० वर आले आहेत. फ्यूचर्स (मार्च) किमती रु. २,२७२ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. २,२९९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,८८२ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. १४,१७१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ०.७ टक्क्याने वाढून रु. १५,३०२ वर आल्या आहेत. जून किमती रु. १५,५३२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ९.६ टक्क्यांनी जास्त आहेत. या तेजीचा अजूनही फायदा करून घेता येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात रु. ६,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक हळूहळू वाढत आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ९,००० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

Cotton And Turmeric
Tur Market: तुरीच्या भावात काही ठिकाणी थोडीशी नरमाई

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ४,५४५ वर आली होती. या सप्ताहात ती ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,६८४ वर आली आहे. चालू वर्षासाठी हमी भाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,६५१ वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्याने वाढून रु. ९,७२२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीचा आवक हंगाम सुरू झाला आहे. २९ डिसेंबरपासून आवक वाढती आहे. २ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात देशातील आवक ६६,००० टन झाली. गेल्या वर्षी ३ सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या सप्ताहात ती ६४,००० टन होती व ती त्या वर्षाची उच्चांकी आवक होती. १६ फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात आवक ५६,००० टन होती.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,११३ होती; या सप्ताहात ती रु. १,४०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,८५७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची

किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो);

कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com