Wild Animal Thirst : जंगलातील वन्यप्राण्यांची तहान भागणार

Forest Department : वनविभागाने जंगल परिसरात ११ पाणवठे तयार करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Amravati News : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत आटले. परिणामी वन्यप्राण्यांनी गावाकडे धाव घेतली. यामुळे वनविभागाने जंगल परिसरात ११ पाणवठे तयार करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

Water Issue
Delhi/Pune Rain Update : दिल्लीसह महाराष्ट्राला  अवकाळीने झोडपले; दिल्लीत दोघांचा मृत्यू, पुण्यात रस्त्यावर पाणी

तालुक्याच्या पायथ्याशी असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत पसरलेल्या घनदाट जंगलात विविध प्रजातीच्या वृक्षांसह वनसंपदा पसरली असून वरुड वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वली, हरीण, रोही, रानडुक्कर यासह अनेक प्रकारचे हिंस्त्र प्राण्यांसह पशुपक्ष्यांचा अधिवास आहे.

उन्हाळ्याच्या दाहकतेमुळे जंगलातील नदी, नाले, पाण्याचे स्रोत आटले असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय जंगलातच व्हावी, यासाठी वनविभागाने लिंगा, महेंद्री, एकलविहीर जंगल परिसरात कायमस्वरूपी ११ कृत्रिम पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकून जंगली प्राण्यांची तहान भागविल्या जात आहे.

Water Issue
Agriculture Irrigation : ‘शेतकरी, पाणीवापर संस्थांनी रविवारपर्यंत अर्ज करावेत’

वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे, पुसला वर्तुळ अधिकारी अजय खेडकर, अनुप साबळे, लिंगा वनपाल, अमोल गावनेर, सुरेश मनगट तसेच वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी गस्तीवर राहून जंगलासह वन्यप्राण्यांची काळजी घेत आहेत.

वरुड तालुक्यातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव टाळण्याकरिता लिंगा, महेंद्री, एकलविहीर जंगल परिसरात ११ कृत्रिम पाणवठे तयार केले. कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एका खासगी कंत्राटदाराला दिली आहे. या पाणवठ्यांमुळे गावशिवारात वन्यप्राण्यांचा शिरकाव टळणार आहे.
पुष्पलता बेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com