Water Shortage
Water ShortageAgrowon

Water Shortage In Latur : जळकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

जळकोट तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढत असून व वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.
Published on

Latur News : अगोदरच पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या डोंगरी जळकोट तालुक्यात (Jalkoat Taluka) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढत असून व वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.

एप्रिल महिना जणू काही उन्हाचा तडाखा घेऊन आला आहे. वन्यप्राणी दुपारी सावलीचा शोध घेत आहेत. कोसो दूर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असून मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Water Shortage
Water Shortage In Jalgaon : जळगावात जलसाठ्यात होऊ लागली झपाट्याने घट

एकीकडे नुकसान करणाऱ्या अवकाळी पावसाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे दुपारच्यावेळी उन्हाचा पारा वाढल्याने जीवाची लाही...लाही होत आहे. कमाल तापमानात ४० च्या आतच असले तरी उकाडा वाढला आहे.

वन्यप्राणी मात्र तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात भटकती करीत आहेत. जनावरांसह रानडूक्कर, ससा, हरिण, माकड, वानर, कोल्हे, रानमांजर आदिंचा समावेष आहे. पाझर तलाव, नदी-नाल्यातील पाणी आटलेले आहे. पशु-पक्षी यांच्या जीवावर ही पाणीटंचाई उठलेली आहे.

त्यामुळे पाण्यासाठी सर्व जीव मानवी वस्त्याकडे धाव घेताना दिसत आहेत. तहान भागविन्यासाठी वन्य पशु पक्षी शेतात पाण्याचा आधार शोधताना दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com