Flood Council : नृसिंहवाडी येथे होणार १६ जूनला तिसरी पूर परिषद

Flood Update : यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने लोकांमध्ये महापुराची भीती आहे. महापूर येऊ नये, यासाठी शासनदरबारी दबावगट निर्माण करण्यासाठी व उपाययोजनांचा ऊहापोह करण्यासाठी १६ जून रोजी नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आली.
Flood
FloodAgrowon

Kolhapur News : यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने लोकांमध्ये महापुराची भीती आहे. महापूर येऊ नये, यासाठी शासनदरबारी दबावगट निर्माण करण्यासाठी व उपाययोजनांचा ऊहापोह करण्यासाठी १६ जून रोजी नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे व ज्येष्ठ अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.

‘आंदोलन अंकुश’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून महापुराच्या कारणांचा शोध व उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यंदाही पूर परिषदेच्या माध्यमातून महापुराच्या प्रश्नाची तीव्रता व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न व्हावेत, यासाठी जागर केला जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले. विजयकुमार दिवाण म्हणाले, ‘‘महापूरप्रश्नी अलमट्टीचा बागुलबुवा पुढे करण्यात आला असला तरी हिप्परगी बंधाऱ्याचे बॅकवॉटर हे मूळ कारण असून त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.’’

Flood
Kolhapur Flood : अलमट्टीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक, कृती समितीचे निवेदन

चुडमुंगे म्हणाले, ‘‘जगभरातील आपत्तींवर त्या-त्या देशांनी उपाययोजना करून मात केली. मात्र महाराष्ट्र शासन महापूरप्रश्नी अपयशी ठरले आहे. आतापर्यंत चार महापूर आम्ही सोसले, मात्र यापुढे सोसणार नाही. त्यामुळे शासनाने थातूरमातूर उपाययोजना न करता ठोस कार्यवाही करावी.’’

Flood
Flood Prone Villages : मराठवाड्यात एक हजारांवर पूरप्रवण गावे

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती (सांगली)चे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, ‘‘महापूर हा कृष्णाकाठी चिंतेचा विषय बनला आहे. यंदा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी.’’ या वेळी राकेश जगदाळे, आप्पासो कदम, महादेव माने, उद्धव मगदूम, सुयोग हावळे, संजय कोरे आदी उपस्थित होते.

‘हिप्परगी बंधाऱ्यावर अधिक लक्ष द्या’

‘‘हिप्परगी बंधाऱ्या‍ची पाणी साठवण क्षमता सहा टीएमसी इतकी असून ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत राजापूर बंधाऱ्या‍तून हिप्परगीकडे ३०० टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यात या बंधाऱ्या‍चे सर्व बरगे काढून टाका व पावसाळा संपत येत असताना किंवा ३१ ऑगस्टनंतर बरगे घातल्यास सहा टीएमसी पाणी सहज साठू शकते,’’ याकडे दिवाण व चुडमुंगे यांनी लक्ष वेधले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com