Flood Prone Villages : मराठवाड्यात एक हजारांवर पूरप्रवण गावे

Flood Update : मराठवाड्यातील १०३१ गावे पूरप्रवन तर १५४४ नदी काठावरील गावे असल्याची माहिती मॉन्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत पुढे आली.
Flood Update
Flood UpdateAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील १०३१ गावे पूरप्रवन तर १५४४ नदी काठावरील गावे असल्याची माहिती मॉन्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत पुढे आली. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, तालुकास्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन समिती व ग्राम पातळीवर आपत्कालीन व्यवस्थापन समिती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.

मराठवाड्यात ८ जिल्हे, ३८ उपविभाग, ७६ तालुके व ६४ लाख ४१ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात ६५ हजार ४८७ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. याशिवाय गोदावरी, पूर्णा, मांजरा,पैनगंगा, दुधना, तेरणा या प्रमुख नद्या आहेत.

Flood Update
Afghanistan Floods : अफगाणिस्तानात पुरामुळे विध्वंस, ६८ जणांचा मृत्यू; ३०० हून अधिक जनावरेही दगावली

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या आठही जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठका पार पडल्यानंतर विभागीय आयुक्त मधुकर राजे यांनी सोमवारी (ता. २०) मराठवाडास्तरीय आढावा बैठक घेतली.

या बैठकीत गत १० वर्षातील सरासरी पर्जन्यमान, गतवर्षीच्या पावसाळ्यातील पर्जन्यमान, पाणी साठ्यांची तुलनात्मक स्थिती, आजवर आलेल्या पुरांचा इतिहास, पुराने बाधित होणारे गोदावरी नदीवरील प्रमुख पूल आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Flood Update
Flood Management Kolhapur : संभाव्य महापुराचा धोका ओळखून मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा'

पुराने बाधित होणाऱ्या गोदावरी नदीवरील प्रमुख पुलांमध्ये छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रस्त्यावरील कायगाव येथील पूल, पैठण-शेवगाव रस्त्यावरील पूल, गेवराई-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील शहागड येथील पूल, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथील पूल, माजलगाव- पाथरी राज्य महामार्ग क्रमांक २९९ वरील ढालेगाव येथील पूल, परभणी-गंगाखेड रस्त्यावरील पूल तर नांदेड लातूर रस्त्यावरील पुलाचा समावेश आहे.

जिल्हानिहाय पूरप्रवन व नदी

काठावरील गावांची संख्या

जिल्हा पूरप्रवण नदी काठावरील

छत्रपती संभाजीनगर १६५ ४३

जालना ४७ १७७

परभणी ११८ २८४

हिंगोली ७० ७०

नांदेड ३३७ ३३७

बीड ६३ ३०६

लातूर ६२ १५८

धाराशिव १६९ १६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com