Maratha Reservation : निजामकालीन नोंदी शोधायला गेलेलं पथक परतले रिकाम्या हाती

Records of the Nizam Period : मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याच्या निजामकालीन नोंदी तपासण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon

Maratha Aarakshan : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी १५ दिवस उपोषण केले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजामध्ये जे पूर्वी कुणबी होते त्यांना नवीन जीआरनुसार प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे पथक हैद्राबादला निजामकालीन मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यासाठी गेले होते. परंतु पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

Maratha Reservation
Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण केले. मराठा आरक्षणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. त्यामुळे राज्य शासनाने जुन्या नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाल कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. परंतु या नोंदी तपासणीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला रवाना झाले होते.

या पथकाने 1967 पूर्वीच्या निजामकालीन 'कुणबी' अशा नोंदी तपासल्या. त्यामधील काही रेकाॅर्ड फारशी भाषेमध्ये . तसेच 1931 पूर्वीची जनगणनेची घरयादी मिळाली नाही. मात्र, ती यादीच महत्त्वाची होती. त्यामुळे पथकाच्या हाती फारसे काही सापडले नाही, अशी माहिती समोर येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com