Women in Agriculture: भविष्य पेरणाऱ्या स्त्रीशक्तीचा संघर्षमय आविष्कार!

Women Empowerment: शेतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या संघर्ष व कलात्मक सृजनशीलतेला उजाळा देणारे ‘भविष्य पेरणाऱ्या महिला’ प्रदर्शन पुण्यात भरवले आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण भागातील महिलांचे जीवन, त्यांचा संघर्ष व हक्कांची लढाई प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
Exhibition
ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेती व्यवस्थेत पुरुषांपेक्षाही जास्त कष्ट उपसत अर्धपोटी राहून ‘भविष्य पेरणाऱ्या’ स्त्रीशक्तीचा कलासक्त आविष्कार पुणेकरांना बघण्यास मिळाला. निमित्त होते महिला शेतकरी विश्वाचा वेध घेणाऱ्या अनोख्या प्रदर्शनाच्या उद्घघाटन सोहळ्याचे.

महिला किसान अधिकार मंच (मकाम) व सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेटिव्ह इकोसिस्टिम मॅनेजमेंट (सोपेकॉम) या संस्थांनी ‘भविष्य पेरणाऱ्या महिला’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाच्या शुक्रवारी (ता.२१) झालेल्या उद्‌घाटन सोहळ्याला ‘मकाम’च्या सीमा कुलकर्णी, महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या ज्योती थोरात (बीड),

Exhibition
Rural Women Empowerment : गावकुसात गायब असलेला महिला दिन

भारतीय किसान युनियनच्या अमनदीप कौर (पंजाब), महाग्रामसभेच्या सचिव कुमारीबाई जमकातन (गडचिरोली), पंजाब विद्यापीठाच्या प्राध्यापिका अनुपमा उप्पल (पातियाळा) व्यासपीठावर होत्या. ‘रूढी परंपरेला गाडायला चला, साऱ्या महिला लढायला चला’ या गीताने कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर वक्त्यांनी महिला शेतकरी जीवनाचं दाहक वास्तव कथन केले.

श्रीमती अनुपमा म्हणाल्या, की अर्थशास्त्राची प्राध्यापक म्हणून काम करताना शेतीमधील बिघडलेले अर्थशास्त्र मला अस्वस्थ करते. यांत्रिकीकरण, खत व कीटकनाशकाच्या वापरात आघाडीवर असलेल्या पंजाबची शेती विविध बाजूने संकटात आहे. शेतीमधील सर्व संकटाचा सारा भार महिलांवर पडतो आहे.

Exhibition
Women Empowerment : आत्मविश्वास, जिद्द असल्यास सर्व काही शक्य

श्रीमती अमनदीप म्हणाल्या, की पंजाबमधील शेतकरी आंदोलनात महिलांची भूमिका मोलाची ठरली. शेतकरी महिलांनी निघून जावे, असे सरकारने सांगितल्यानंतर महिला हटल्या नाहीत; उलट त्यांची संख्या वाढली. महिला वर्ग जागृत झाल्याचा हा पुरावा होता. सीमा कुलकर्णी यांनी राज्यातील शेतीमधील महिलांना ओळख नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

ज्योती थोरात म्हणाल्या, की आम्हाला आधी महिला ऊसतोड कामगार म्हणून ओळख नव्हती. त्यासाठी संघर्ष करावा लागला. बीड जिल्ह्यात काटोडा गावात महिलांना प्रथमच ओळखपत्र मिळाले. मुलींची समस्या मोठी असून मुली एकट्या राहत असल्यामुळे त्यांचे बालविवाह करावे लागतात. त्यातून त्यांचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते.

गडचिरोलीतील महिलांचा संघर्ष कुमारीबाईंनी कथन केला. त्या म्हणाल्यास, की लाकूडतोड, वणवे, शिकार यांपासून जंगल वाचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com