Dairy Business : दुग्ध व्यवसायातून साकारला स्वप्नातील बंगला !

Struggle of Dairy Business : पहाटेचे चार वाजताच घरातील दिवे उजळतात. पटापट आवराआवर करून ते दोघेही कामाला लागतात.
The dream bungalow of Sandeep and Kavita
The dream bungalow of Sandeep and KavitaAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पहाटेचे चार वाजताच घरातील दिवे उजळतात. पटापट आवराआवर करून ते दोघेही कामाला लागतात. पाच वाजता दुधाची धार भांड्यात पडते. पती-पत्नी एकेका म्हशींचे दूध पटापट काढू लागतात. सूर्य उगवण्यापूर्वीच दूध काढून होते. एक जण गोठ्याच्या स्वच्छतेमागे लागतो, तर दुसरा गाडीला किक मारून डेअरीकडे दूध घालण्यासाठी निघतो.

मागे आल्यावर जनावरांचे चारापाणी करायला लागते. सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत गोठ्यातील सर्व कामे उरकलेली असतात. बरे, हे एक, दोन दिवसाचा नाही, सलग सहा-सात वर्षे चांदा दांपत्याचा हा दिनक्रम अखंडपणे सुरू आहे. दिवसभरात पुन्हा चारा, पाणी याकडे लक्ष द्यायचे...सायंकाळ झाली की पुन्हा दूध काढणे...डेअरीवर पोहोचवून देणे... हे चक्र सातत्याने फिरत राहते.

चांडोळ, (ता. बुलडाणा) येथील संदीप धनराज चांदा आणि त्यांची पत्नी कविता हे दोघे आपल्या कष्टातून परिसरातील पशुपालकांसाठी आदर्शवत जोडपे म्हणून ओळखले जाऊ लागले. संदीप म्हणजे जे काम हाती घेऊ, ते तडीला नेणारा रांगडा तरुण. सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ च्या अखेरीस एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्यावर हाती छदामही नव्हता.

The dream bungalow of Sandeep and Kavita
Israel Dairy Business : दुग्ध व्यवसायात जगात अव्वल इस्राईल

मनात होती फक्त हिमत आणि पत्नीची सोबत. दोघेही ढंगारपूर मार्गालगत असलेल्या शेतात राहायला आहे. राहण्यासाठी चार टीनपत्र्यांचे घर म्हणजे एक झोपडीच होती. शेतात मोलमजुरी करणाऱ्या संदीपने व्याजाने पैसे घेत २०१८ मध्ये दोन म्हशी घेतल्या. ही रक्कम व्याजासह तीन वर्षांत फेडली. दुग्ध व्यवसायात जम बसवत एक-एक म्हैस वाढवत नेली.

आज संदीप यांच्या गोठ्यात तब्बल १० म्हशी आहेत. या म्हशींपासून मिळणारे दूध ते सकाळ-संध्याकाळ म्हसला येथे संकलन केंद्रात पोहोचवतात. वडिलोपार्जित मिळालेल्या दोन एकरांत ते जनावरांसाठी गवत, काही क्षेत्रात मका, आल्याची शेती करतात. इतरांप्रमाणेच आज संदीप हे दुग्ध व्यवसायात रमले आहेत.

‘‘या व्यवसायाने आमच्या कुटुंबाला काय दिले नाही?’’ असा उलट प्रश्‍नच संदीप विचारतो. पुढे त्याला उत्तर म्हणून स्वतःच सांगू लागतो, ‘‘चार पत्र्यांच्या घराशेजारीच आमच्या स्वप्नातील घर उभे राहत आहे. आजवर २२ लाख रुपये खर्च केलेल्या या नव्या वास्तूचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या वास्तूत राहायला जाणार आहोत.’’

ते स्वतः घर म्हणत असले तरी मोठा बंगलाच आहे तो. चार पत्र्यांपासून सुरू करून सिमेंट काँक्रीटचे घर उभे केल्याचा आनंद, अभिमान या चांदा उभयतांच्या चेहऱ्यावर लपता लपत नाही. परिसरात कुणाच्याही घरात भांड्याला भांडे लागले, महिलांमध्ये बेबनाव झाला तर कविता यांचे उदाहरण जुनेजाणते देतात.

The dream bungalow of Sandeep and Kavita
Dairy Farming : फायदेशीर दुग्ध व्यवसाय मॉडेलची विदर्भात गरज

पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कंबर कसून हिमतीने पतीला मदत करणारी बाई म्हणून दाखले दिले जातात. तेव्हा संदीप यांचा चेहरा त्यांच्याविषयीच्या अभिमानाने उजळून निघतो. कविता बारावीपर्यंत शिकलेल्या आहेत. या दांपत्याला आदित्य व आंचल ही दोन अपत्ये आहेत. आपण शिकू शकलो नाही, ही खंत दडपत दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.

ते स्वतः घर म्हणत असले तरी मोठा बंगलाच आहे तो. चार पत्र्यांपासून सुरू करून सिमेंट काँक्रीटचे घर उभे केल्याचा आनंद, अभिमान या चांदा उभयतांच्या चेहऱ्यावर लपता लपत नाही. परिसरात कुणाच्याही घरात भांड्याला भांडे लागले, महिलांमध्ये बेबनाव झाला तर कविता यांचे उदाहरण जुनेजाणते देतात.

पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कंबर कसून हिमतीने पतीला मदत करणारी बाई म्हणून दाखले दिले जातात. तेव्हा संदीप यांचा चेहरा त्यांच्याविषयीच्या अभिमानाने उजळून निघतो. कविता बारावीपर्यंत शिकलेल्या आहेत. या दांपत्याला आदित्य व आंचल ही दोन अपत्ये आहेत. आपण शिकू शकलो नाही, ही खंत दडपत दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.

संदीप यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा भाऊही दुग्ध व्यवसायात आला आहे. दोघा भावांचे गोठे आता शेजारी शेजारीच उभे आहेत. एकेकाळी छोट्या छोट्या समस्यांसाठी व्याजावर पैसे घ्याव्या लागणाऱ्या संदीप यांनी दुग्ध व्यवसायातून २२ लाखांचा बंगला उभा केला आहे. कष्टाने, हिमतीने उभा केलेल्या व्यवसायाने आयुष्याला दिशा दिली, आर्थिक संपन्नता दिली. आपल्या कष्टाला आलेले फळ स्वतः चाखता येणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे काय असू शकेल?

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com