Fodder Scarcity : राज्य भीषण चाराटंचाईच्या उंबरठ्यावर

Animal Fodder Shortage : भाजून काढणाऱ्या उन्हात पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ राज्याच्या काही भागांत आलेली असताना दुसऱ्या बाजूला चाराटंचाईची भीषण समस्या भासू लागली आहे.
Animal Fodder
Animal FodderAgrowon

Pune News : भाजून काढणाऱ्या उन्हात पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ राज्याच्या काही भागांत आलेली असताना दुसऱ्या बाजूला चाराटंचाईची भीषण समस्या भासू लागली आहे. मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीत चाराटंचाईचे वास्तव राज्यकर्त्यांच्या दृष्टीस येत नसल्यामुळे राज्यातील पशुपालकांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हिरव्या चाऱ्याची टंचाई

पश्चिम महाराष्ट्रात चाऱ्याची उपलब्धता त्यातल्या त्यात बरी आहे. तरीदेखील संभाव्य टंचाई विचारात घेत पशुसंवर्धन विभागाने चारा बियाण्यांचे वाटप केले आहे. सांगली जिल्ह्यात जनावरांची संख्या सव्वा बारा लाखांच्या पुढे आहे. सध्या साडेपंधरा लाख चारा असल्यामुळे टंचाईची स्थिती नाही, असा दावा प्रशासन करीत आहे. परंतु उसाचा चारा संपल्यामुळे केवळ सुक्या चाऱ्याचा पर्याय उरला आहे.

Animal Fodder
Fodder Shortage : चाराटंचाईचे वाढते संकट

सोलापूर जिल्ह्यात तप्त उन्हाबरोबरच पाणी आणि चाराटंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यात २१.५५ लाख चारा असून तो पुढील १०९ दिवस पुरेल, असे प्रशासन सांगते आहे. परंतु चाऱ्याचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. चारा टंचाईमुळे जनावर बाजारात आधी एक ते दीड लाख रुपयाला विकली जाणारी गाय आता निम्मा किमतीत विकण्यास पशुपालक तयार झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चारा बाजारातून उसाचे वाढे गायब झाले आहेत. त्यामुळे गवत व मक्यावरच चाऱ्याची भिस्त आहे. मेपर्यंत हिरव्या चाऱ्याअभावी दुधाळ जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.

उत्तर महाराष्ट्रात समस्या वाढली

नाशिकच्या नांदगाव, सिन्नर, चांदवड व येवला तालुक्यात चाराटंचाई आहे. नांदगाव तालुक्यात पशुपालक भयावह समस्येत आहे. सध्या तेथे जनावरांसाठी एक हजार रुपये मोजून एक हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागते.

खानदेशात चाराटंचाई वाढली आहे. भाकड पशुधन अर्धपोटी गुजराण करते आहे. जळगावच्या पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, बोदवड भागात चाराटंचाई आधीपासूनच आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी लागणारा सात ते आठ लाख टन इतका चारा उपलब्ध नाही. त्यामुळे दादर ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा पाच हजार रुपयाला विकला जात आहे.

Animal Fodder
Fodder Shortage : परराज्यांतील जनावरांच्या अडचणीमुळे चाराटंचाईत भर

विदर्भ, मराठवाड्यात विदारक स्थिती

विदर्भात मुबलक चारा असल्याचा दावा फोल ठरतो आहे. कारण, नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये गंभीर चारा टंचाई आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात चाराटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. हिंगोलीत जूनमध्ये वेळेत पाऊस न झाल्यास चारा टंचाईची समस्या गंभीर होऊ शकते. परभणीतील दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्याबाहेर चार वाहतूक व विक्रीस बंदी लादण्यात आली आहे.

९० लाख जनावरे कशी सांभाळायची?

आचारसंहितेमुळे शासनाला चाऱ्याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे सरकारी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे वाढत्या पाणी व चाराटंचाईमुळे राज्यातील ९० लाख पशुधन पुढील दोन महिने कसे सांभाळावे, असा बिकट प्रश्न तयार झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास चारा परराज्यांतून किंवा विदेशातून आयात करण्याची वेळ येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

राज्यात मुबलक चारा असल्याचा दावा

चाराटंचाई असल्यामुळे पशुपालक हैराण

पशुसंवर्धन विभागाकडून बैठकांचा धडाका

मेमध्ये चाराटंचाई गंभीर होण्याचे संकेत

चारा बियाण्यांचे वाटप सुरू; मात्र पाणीटंचाईमुळे चारापिके धोक्यात

मका, ऊस बांड्या, कडवळ, घास, हिरव्या चाऱ्याचे दर वाढले

चाराटंचाईमुळे शेतकऱ्यांनी जनावरे विकण्यास काढली

अनेक जिल्ह्यांत कोरडा चारा उपलब्ध; मात्र हिरव्या चाऱ्याची टंचाई

खानदेश, विदर्भ, मराठवाड्याला चारा टंचाईच्या झळाचाराटंचाई भीषण आहे. पाऊस पडेपर्यंत गुरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न पडला आहे.
विष्णू लांडगे, शेतकरी, भोकरखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com