Sugarcane Season : सोलापूर जिल्ह्यातील तीस साखर कारखान्यांचा हंगाम संपला

Sugarcane Factory Update : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून, जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांचा हंगाम आटोपल्याने धुराडी थंडावली आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून, जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांचा हंगाम आटोपल्याने धुराडी थंडावली आहेत. जिल्ह्यात २ एप्रिलअखेर एक कोटी ६२ लाख ६८ हजार ८२६ टन उसाचे गाळप होऊन एक कोटी ५३ लाख ६८ हजार ३८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा ९.४५ टक्के आहे.

Sugarcane
Sugarcane Season : मराठवाड्यातील ४४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

यंदा सर्वाधिक ३५ कारखान्यांनी गाळप हंगाम केला. त्यापैकी सिद्धेश्‍वर, विठ्ठल (वेणूनगर), पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब हे पाच कारखाने अजून सुरू असल्याचे दिसून येते. तर उर्वरित ३० कारखान्यांनी आपला हंगाम आटोपला आहे

Sugarcane
Sugarcane Season : यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबला, १५७ कारखान्यांचे धुराडे बंद

१२ सहकारी साखर कारखान्यांनी ७६ लाख ३१ हजार ३६० टन उसाचे गाळप करून ९.८३ टक्के साखर उताऱ्याने ७५ लाख १९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर २३ खासगी कारखान्यांनी ८६ लाख ३७ हजार ४६७ टन ऊस गाळप केले आहे.

कारखानानिहाय गाळपाचा दोन एप्रिलअखेरचा आढावा

कारखाना गाळप (टन) साखर (क्विंटल) उतारा (टक्के)

सहकार महर्षी ९९०००० ९७६४०० ९.९३

श्री. शंकर ३२१०५० २८६८५० ८.९२

सिद्धेश्‍वर ७०४३१५ ६२५३२० ८.८९

विठ्ठल, वेणूनगर १०२५४०० १०४६३२५ १०.३२

भीमा १३१८९१ ८४२०० ६.७७

पांडुरंग १००२०१२ १०७४५९५ १०.८७

संत दामाजी ३८०५३५ ३८४३०० १०.१९

सांगोला (धाराशिव) २१०२४९ १८९२०० ९.०६

सहकार शिरोमणी २३७०५१ २०४००० ८.३६

विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर १८३४०८२ १८४९१०० ९.८८

संत कूर्मदास १८५७०० १३५२०० ७.१

लोकनेते ६१५२४० ६१७८०० ९.९८

सासवड माळी ४४१६८८ ४३४१८० ९.६९

लोकमंगल, बिबीदारफळ १५०९३१ १३०३५० ८.१८

विठ्ठल कार्पोरेशन ५०१८९३ ३८६१५० ८.०३

लोकमंगल, भंडारकवठे ४०३०६७ ३०६५१० ७.८३

सिद्धनाथ ३१३६४९ २७१४५० ८.७

जकराया २६७७१४ १८३१५० ७.३४

भैरवनाथ, विहाळ २५४३३१ २३१००० ८.९७

इन्द्रेश्‍वर २६२५६० २७२७०० ९.९२

येडेश्‍वरी २६४५०४ २६२६०० ९.८१

मातोश्री २३०९३४ २१४८०० ९.२५

विठ्ठलराव शिंदे, करकंब ६०९०७४ ६४४७०० १०.५८

सीताराम महाराज ४२२१९६ ३८०००० ९.०१

ओंकार १८३७९३ १५७३४० ८.८७

आवताडे शुगर ४०४४८५ ३७९२०० ९.५४

युटोपियन ४०२८०३ ३३९६८० ८.६६

भैरवनाथ, लवंगी ३०१९१२ २९४३५० ९.६२

भैरवनाथ, आलेगाव २०३२६० १८६१०० ९.१२

जयहिंद ७९३५०७ ६९००५० ८.६२

बबनरावजी शिंदे ८२२२४० ८८४५५५ १०.७८

गोकुळ शुगर ६२६९५४ ५८४५२५ ९.४७

विठ्ठल रिफाइंड १९५९७३ १६०७०० ८.२८

व्ही.पी. शुगर्स ४४३९९६ ४१३३०० ९.०५

आष्टी शुगर १०९८६८ ८७७०० ८.०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com