Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Paddy Production : विक्रमगडमधील शेतकरी आर्थिक संकटात; बाजारपेठांचा अभाव
Paddy MSP
Paddy MSPagrowon
Published on
Updated on

Vikramgad News : विक्रमगड येथे भातपीक खरेदीसाठी मोठी व योग्य अशी बाजारपेठ नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे. त्यातच सरकारने अजूनही भातखरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे उत्पादित भातपिकाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सद्यस्थितीत पिकवलेल्या पिकाची विक्री बाजारात करून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून व उर्वरीत घरात खाण्यासाठी ठेवलेले भात असे त्यांचे वर्षभराचे उदरनिर्वाहाचे गणित असते. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने व ऐन कापणीच्या काळात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Paddy MSP
Agriculture MSP : दीडपट हमीभावाची पुन्हा एकदा चलाखी

याशिवाय, आता शेतकऱ्यांवर उत्पादित भातपिकाला योग्य हमी भाव मिळण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात जया, रत्ना, सुवर्णा, कोलम, मसुरी अशा वेगवेगळ्या अनेक सुधारीत जातीच्या भाताची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. या पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता या उत्पादित पिकाला योग्य बाजारपेठ व योग्य हमी भाव मिळणे अनिवार्य असल्याने शेतकरी खरेदी केंद्राची मागणी करत आहेत. आता शेतात असलेल्या भातपिकाची कापणी करून बाजारपेठेत नेता येईल, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

Paddy MSP
Paddy Harvesting : खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात भात पिकाच्या कापणीसाठी आधुनिक तंत्राला प्राधान्य

कर्जाची परतफेड करण्याची चिंता दोन-चार वर्षांपासून शेतकरी भातशेतीवर अफाट खर्च करून पीक तयार करत आहेत; मात्र त्यालाही हमीभाव नाही. त्यात वाढती मजुरी, खत, बी-बियाणे, शेती साहित्यामध्ये सततची होणारी भाववाढ यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. भातपीक विकून या कर्जाची परतफेड त्यांना करावयाची आहे. यासाठी सरकारने योग्य हमी भाव देणे गरजेचे आहे. परंतु, अद्याप हमी भाव व भात खरेदी केंद्र हालचाली सुरू नसल्याने चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बाजारपेठअभावी शेती परवडेना भातशेतीला उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन क्षमता कमी; शिवाय सरकारचे भातपीक शेतकऱ्यांकडे असलेले दर्लक्षु यामुळे शेती परवडत नाही. भातपीक तयार होऊन विक्रीस आणले जात आहे; परंतु खरेदी केंद् सुरू होण रे ्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना कमी भावात भातपिकाची विक्री करावी लागते. योग्य भाव व बाजारपेठ नसल्याने भातशेती परवडेना, अशी झाली आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय संकटाला सामोरे जात असल्याने तरुणवर्गही या याकडे दर्लक्षु करत आहेत.

निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई, पिकांवर येणारा रोग त्यामुळे शेती पिकवणे कष्टाचे झाले आहे. केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे उत्पादित केलेल्या मालाला योग्य हमी भाव व योग्य अशी बाजारपेठ असणे आवश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या खरेदीसाठी भातखरेदी केंद्रे सुरू करून दिलासा द्यावा.
रावजी तुबडा, शेतकरी, आंबेघर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com