Teachers Role : मतदारांच्या जाणीव जागृतीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

IAS Dilip Swami : मतदारांमध्ये मतदानासाठीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते व ते काम शिक्षकांनी चोखपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
IAS Dilip Swami
IAS Dilip SwamiAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मतदारांमध्ये मतदानासाठीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते व ते काम शिक्षकांनी चोखपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी (ता. १६) केले.

जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक (ता. १६) शनिवारी घेण्यात आली. स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जाणीव जागृतीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

IAS Dilip Swami
Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांचा इरादा पक्का ; निवडणूक काळातही सुरूच राहणार आंदोलन

या वेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, शिक्षणाधिकारी (माध्य) एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथ) जयश्री चव्हाण, मनपा उपायुक्त पांढरे, ‘स्वीप’ नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती भूमकर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

IAS Dilip Swami
Impact of La Nino on Soybean : ‘ला-निना’ सोयाबीन उत्पादकांना लाभदायक ठरेल?

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की जिल्ह्यात गेल्या निवडणुकीला मतदानाची टक्केवारी कमी होती. हे प्रमाण वाढायला हवे. मतदारांमध्ये मतदानासाठी जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. प्रत्येक घरापर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांपेक्षा योग्य व्यक्ती नाही.

त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन. प्रत्येक व्यक्ती संस्था, शाळा, आणि विद्यार्थी- पालक यांनी या लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हावे व लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com