Solapur DCC Bank Scam : निकाल लागताच मविआच्या नेत्यांवर वसुलीची टांगती तलवार; दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ

MVA leaders under extortion cloud after election results: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकर समोर आले होते.
Solapur District Central Cooperative Bank Scam
Solapur District Central Cooperative Bank ScamAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभेचा निकालानंतरच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सोलापुरमधील मोहिते-पाटील, दिलीप सोपल, आणि राजन पाटील या मविआच्या मातब्बर नेत्यांसह ३५ जणांकडून निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. यामुळे आता सोलापूरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटपात सुमारे २३८ कोटी ४४ लाखांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील विभानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा धुरळा उडाला. यामुळे आता मविआच्या अनेक नेत्यांना या ना त्या संकटांना तोंड द्यावे लागेल, अशा चर्चांना उधान आले होते. याचदरम्यान मविआच्या नेत्यांना पहिला झटका सोलापूरमध्ये बसला आहे. येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीच्या रक्कमेच्या वसुलीचे आदेश चौकशी अधिकारी तोष्णीवाल यांनी दिले आहेत.

Solapur District Central Cooperative Bank Scam
Solapur DDC Bank : मोहिते-पाटील, दिलीप सोपल यांच्यासह ३३ जणांच्या अडचणीत वाढ; सोलापूर जिल्हा बँक अनियमित कर्ज वाटपाच्या वसुलीचे आदेश

या आदेशानंतर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ज्यात माजी-आजी आमदारांसह मंत्र्याचा समावेश आहे. तर सर्वाधिक महाविकास आघाडीचे नेते अडचणीत येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सोलापुरमधील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री तथा शिवसेना (उबाठा) नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल, भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह ३५ जणांचा समावेश आहे.

Solapur District Central Cooperative Bank Scam
Solapur DCC Bank Case : ‘डीसीसी’ आर्थिक नुकसानप्रकरणी २३८ कोटी रुपयांची वसुली निश्चित

नेमकं काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहार करत तब्बल २३८ कोटी ४३ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामुळे बँकेला फटका बसला होता. तर कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळे बँक बंद होण्याच्या मार्गावर होती. यामुळे बँकेवर बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. याप्रकरणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती. आता थकीत रकमेच्या वसुलीचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी दिले असून अनेक दिग्गज नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

व्याजासह होणार वसूली

बँकेच्या गैर व्यवहारात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर ३० कोटींहून अधिकच्या रक्कमेची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर देखील ३० कोटीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात जवळपास ३५ जणांची नावे समोर आली असून यात बँकेच्या तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आदेशाप्रमाणे या सर्वांकडून १२ टक्के व्याजासह रक्कम वसूल केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com