
Pune News : राज्यात विभानसभा निवडणुकी दरम्यान मविआसमोर संकट उभारले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी मोहिते-पाटील, दिलीप सोपल, आणि राजन पाटील या मातब्बर नेत्यांसह ३३ जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. गैरव्यवहारात सुमारे २३८ कोटी ४४ लाखांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीवेळी सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटपातील गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाविरोधात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँककेकडे तक्रार केली होती. तसेच गैरव्यवहारातील रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी केली होती. यानंतर सहकार विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या चौकशीत गैरव्यहाराचे तथ्य उघड झाले होते. पण कारवाई झाली नव्हती. यामुळे राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने यावरून संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आता ३५ ते ३६ जणांवर जबाबदारी निश्चिच करण्यात आली आहे. तर विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. या अहवालाप्रमाणे आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीज सोपल आणि माजी आमदार दीपक साळुंखे सध्या विधानसभेच्या मैदानात असून निवडणूक लढवत आहेत.
तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिती पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार सिद्रामाप्पा पाटील यांच्यासह इतरांचा समावेश या प्रकणात आहे.
सोलापूर डीसीसी बँकेच्या गैरव्यवहारात तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरण्यात आले असून मृत्यू झालेल्या नेत्यांच्या वारसदारांना यात जबाबदार धरण्यात आले आहे. या आदेशानंतर आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निकालानंतर समाधान व्यक्त करताना आपल्या लढ्याला यश आल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
याच प्रकरणावरून सोलापूर येथील बार्शी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी, ठाकरे गटाचे उमेदवार तथा माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर टीका करताना, ज्यांनी सोलापूर जनता बँक लुटली त्यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल मतदारांना केला होता. तसेच शिंदे यांनी, सोपल यांच्या विविध संस्था लुटल्याचा, घोटाळा केल्याचा आरोप आहे. अशा उमेदवाराला मत देणार का? असाही सवाल केला होता.
....आता विधानसभेचे काय?
सोलापूर डीसीसी बँकेच्या गैरव्यवहारात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे प्रचाराची धूरा सोपावण्यात आली आहे. तर आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीज सोपल आणि माजी आमदार दीपक साळुंखे हेच उमेदवार आहेत. यामुळे या आरोपानंतर मविआचे उमेदवार येथे विजयी होणार का? याचा निवडणुकीवर परिणाम होणार का? आता हे निवडणुकीनंतरच दिसणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.